भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यातील पहिला दिवस संपला. पहिल्याच दिवशी पावसाने खोळंबा घातला, ज्यामुळे सामना लवकरच बंद करण्यात आला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 35 षटकेच खेळता आली. पावसाने खोळंबा घातल्याने, सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस पुन्हा खोळंबा घालणार का? यावर चाहत्यांची नजर आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हवामान कसे असेल याबद्दल जाणून घेऊया.
एक्यूवेदरच्या रिपोर्ट्सनुसार, सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसामुळे कानपूरचा खेळ खराब होऊ शकतो. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आकाश ढगाळ असेल आणि मधूनमधून पाऊस पडेल. उद्या दुपारी कानपूरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत भारत आणि बांगलादेश कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाऊस चाहत्यांना निराशा करण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 35 षटके खेळली गेली. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या. मोनिमुलने 81 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या आहेत, तर मुशफिकर रहीमने नाबाद 13 चेंडूत 6 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारताने पहिल्या दिवशी बांगलादेशला 3 मोठे धक्के दिले. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) ठरला. आकाशने पहिल्या दिवशी दोन विकेट्स घेतल्या, तर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) देखील एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
पाच वनडेत केवळ 4 विकेट्स घेणारा गोलंदाज आयपीएल लिलावात ठरणार महागडा? कारण आहे खास
तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणाऱ्या अलीम दार यांची निवृत्तीची घोषणा
युवराज सिंगने पंतची ‘या’ दिग्गज यष्टीरक्षकासोबत केली तुलना, एमएस धोनीचे घेतले नाही नाव!