टी20 विश्वचषक 2024 विजेता भारतीय संघ गुरुवारी सकाळी बार्बाडोसहून नवी दिल्लीला पोहोचला. त्यानंतर दुपारी सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफनं पंतप्रधान मोदींसोबत नाश्ता केला आणि फोटोशूट आटोपल्यानंतर टीम इंडिया मुंबईला रवाना झाली. तेथे भारतीय संघाची विजय परेड होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) भारतीय संघाच्या विजय परेडसाठी जय्यत तयारी केली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की विजय परेडची सुरुवात कशी झाली? टीम इंडियाची पहिली विजय परेड कधी झाली होती? चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला ही सर्व माहिती देतो.
‘विक्ट्री परेड’चा उगम प्राचीन रोममध्ये झाला आहे. जुन्या काळातील राजे जेव्हा युद्ध जिंकून परत येत होते, तेव्हा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विजयी परेडचं आयोजन करण्यात येत होतं. पण प्रश्न असा आहे की, युद्ध आणि खेळ यांचा काय संबंध आणि खेळांमध्ये विजय परेडचा ट्रेंड कुठून सुरू झाला?
इंग्रजी भाषेतील कवी आणि कादंबरीकार जॉर्ज ऑरवेल यांनी सर्वप्रथम युद्धाची तुलना खेळाशी केली. त्यानंतर याचा खेळातही वापर केला गेला, जो यशस्वी झाला. तेव्हापासून खेळात विजय परेडची प्रथा सुरू झाली.
2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघानं पाकिस्तानला पराभूत करून टी20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ मुंबईत परतला तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळीही वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण टीम इंडियाचा गौरव करण्यात आला होता. भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंनी खुल्या बसमधून प्रवास केला होता. तेव्हाही हजारो चाहत्यांची गर्दी रस्त्यावर जमली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहचा मुलगा मोदींच्या कडेवर, पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
थालाचा साधेपणा, धोनीनं या पध्दतीने साजरा केला आपल्या लग्नाचा वाढदिवस
पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफी हातात न घेता रोहित-द्रविडचा हात का धरला? जाणून घ्या