---Advertisement---

रोहितच्या अनुपस्थितीत कशी असू शकते टीम इंडिया? पहिल्या वनडे सामन्याविषयी सर्व माहिती एकाच क्लिकवर

Team-India
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका संपली आहे. ही मालिका भारताने 2-1ने जिंकली. आता दोन्ही संघांचे लक्ष 3 सामन्यांच्या वनडे मालिकेवर आहे. ही वनडे मालिका भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असणार आहे. भारतासाठी 2023 हे वर्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी खूपच शानदार राहिले आहे. भारताची नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंका आणि न्यूझीलंडवरील विजयाने झाली.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यावर्षी त्यांचा पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत त्यांच्या तीन धुरंधर खेळाडूंशिवाय उतरावे लागणार आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन आणि जोश हेजलवूड या मालिकेत खेळणार नाहीत. दुसरीकडे, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नसणार आहे. त्याच्या जागी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करेल. तसेच, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. चला तर आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या वनडे सामन्याबाबत सर्वकाही गोष्टी जाणून घेऊयात…

कधी खेळला जाणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (दि. 17 मार्च) खेळला जाणार आहे.

कुठे खेळला जाणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

किती वाजता खेळला जाणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळला जाणार आहे. सामन्याच्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजे 1 वाजता उभय संघात नाणेफेक होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. याव्यतिरिक्त फ्री डिश डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे प्रसारण पाहता येईल. (when and where to watch ind vs aus 1st odi live streaming match and predicted playing xi know here)

भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन?
शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी
जीवघेण्या कॅन्सरला मात देणाऱ्या युवराजने घेतली रिषभची भेट, विस्फोटक पंतला हिम्मत देत म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---