केपटाऊन। आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा आणि निर्णायक टी २० सामना होणार आहे. ३ सामन्यांची ही टी २० मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाला उद्याच्या सामन्यात विजय आवश्यक आहे.
पहिला टी २० सामना भारताने २८ धावांनी जिंकला होता तर दुसरा टी २० सामना दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने जिंकले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्याच इराद्याने उतरतील. तसेच हा सामना भारताचा यावर्षीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील शेवटचा सामना असणार आहे.
हा दौरा भारतीय संघासाठी चांगला ठरला आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने पराभव स्वीकारला होता. तर वनडे मालिकेत पुनरागमन करताना भारतीय संघाने ५-१ ने मालिका जिंकली. याबरोबरच प्रथमच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मालिका जिंकण्याचा इतिहासही भारतीय संघाने रचला आहे.
कुठे होईल दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा टी २० सामना?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील तिसरा टी २० सामना आज, केपटाऊन येथील न्यूलँड स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आहे.
किती वाजता सुरु होणार हा सामना?
तिसरा टी २० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरु होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून या सामन्याचे प्रसारण होईल?
सोनी टेन १ स्पोर्ट्स आणि सोनी टेन १ स्पोर्ट्स एचडी या दोन चॅनेल्सवरून इंग्लिश कॉमेंट्रीसह सामना प्रसारित होईल. तर सोनी टेन ३ आणि सोनी टेन ३ एचडी या चॅनेलवरून हिंदी कॉमेंट्रीसह हा सामना प्रसारित होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणार तिसरा टी २० सामना SonyLIV.com या वेबसाईटवरून ऑनलाईन पाहता येणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचा संघ:
भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार),शिखर धवन, केएल राहुल, सुरेश रैना, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका संघ: जेपी ड्युमिनी(कर्णधार), फरहान बेहार्डीन, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरीस,अँडिल फेहलूकवयो, ताब्राईझ शम्सी, जुनिअर डाला,रिझा हेन्ड्रिक्स,ख्रिस्तियन जोंकर,डेन पीटरसन,एरॉन फँगिसो,जे जे स्मटस.