आयसीसी १९ वर्षाखालील स्पर्धा (Icc under 19 world cup) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने अफगाणिस्तान संघाला पराभूत करत अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. तर भारतीय संघाचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध रंगणार आहे (Indian under 19 vs australia under 19) . हा सामना जिंकून भारतीय संघ ५ वे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. परंतु हा उपांत्य फेरीचा सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर दबाव असणार असे. जो संघ दबाव हाताळून चांगली कामगिरी करेल. तो संघ निश्चितच विजय मिळवेल. चला तर जाणून घेऊया, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्याबद्दल अधिक माहिती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना केव्हा खेळला जाईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना बुधवारी (२ फेब्रुवारी) रोजी पार पडणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ६ वाजता होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना लाईव्ह कुठे पाहू शकाल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहू शकाल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकाल?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डीस्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही www.mahasports.in वर मिळवू शकता.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आठव्यांदा आमने सामने येणार आहेत. यापूर्वी खेळलेल्या ७ सामन्यात ५ वेळेस भारतीय संघाने बाजी मारली होती. तर ऑस्ट्रेलिया संघाला २ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. तर मुख्य बाब म्हणजे भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कधीच पराभव पत्करावा लागला नाहीये.
महत्वाच्या बातम्या :
सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’