भारतीय संघाची बांगलादेश दौऱ्यावरील सुरुवात निराशाजनक राहिली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारताला यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारताला लिटन दास याच्या नेतृत्वातील बांगलादेशकडून 1 विकेटने पराभव पत्करावा लागला. अशात आता दुसरा सामना बुधवारी (दि. 7 डिसेंबर) ढाका येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना 41.2 षटकात सर्वबाद 186 धावा केल्या होत्या. हे आव्हान बांगलादेशने 46 षटकात 9 विकेट्स गमावत पूर्ण केले. भारतीय संघाची फलंदाजी सोडली, तर सामन्यात गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. सामन्यात भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कुलदीप सेन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 1 विकेटवर आपले नाव कोरले.
अशात दुसऱ्या सामन्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया…
बांगलादेश विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळला जाईल?
बांग्लादेश आणि भारत संघातील दुसरा वनडे (Bangladesh vs India 2nd ODI Match) सामना ढाका येथे बुधवारी (दि. 7 डिसेंबर) खेळला जाईल.
बांगलादेश विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना कधी, किती वाजता सुरू होईल?
बांग्लादेश आणि भारत (Bangladesh vs India) संघातील दुसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. तसेच, नाणेफेक 11 वाजता होईल.
बांग्लादेश आणि भारत संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळेल?
बांग्लादेश आणि भारत संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.
बांग्लादेश आणि भारत संघातील दुसरा वनडे सामना कशावर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल?
बांग्लादेश आणि भारत संघातील दुसरा वनडे सामना सोनी लिव्ह ऍपवर पाहायला मिळू शकतो. (when and where to watch india vs bangladesh 2nd odi 2022 live streaming read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा इतिहास घडवणार? धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये असा राहिलेला बांगलादेश दौरा
तिसऱ्या महिला टी -20 क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील रॉयल्स, चंद्रोस, गॅरी कर्स्टन संघांची विजयी सलामी