सिनेमा आणि टीव्ही यांच्याशी क्रिकेटचे वेगळेच नाते आहे. अनेक खेळाडूंनी आपल्याला सिनेमात आणि टीव्ही शोमध्येही दिसले आहेत. असाच एक वादग्रस्त पण तितकाच प्रसिद्ध टीव्ही शो असलेल्या ‘बिग बॉस’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने सहभाग घेतला होता. तो खेळाडू म्हणजेच दिवंगत एँड्र्यू सायमंड्स होय. सायमंड्सचे शनिवारी (दि. १४ मे) एका कार अपघातात निधन झाले. सायमंड्स नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत राहिला. सायमंड्स जेव्हा बिग बॉसमध्ये सामील झाला होता, तेव्हा त्याला या शोमध्ये चांगली पसंती मिळाली होती. त्याने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.
एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) २०११-१२ मध्ये बिग बॉस (Bigg Boss) शोमध्ये दिसला होता. तो एक पाहुणा म्हणून शोमध्ये आला होता. तसेच, त्याची अनुवादक म्हणून पूजा मिश्रा हिने साथ दिली होती. दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू असलेला सायमंड्स बिग बॉसच्या घरात ११ दिवस राहिला होता. त्याला हिंदी येत नसली, तरी त्याने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. अशाच एका एपिसोडमध्ये जेव्हा त्याला घरच्या दोन मैत्रिणींना प्रपोज करायचे होते, तेव्हा त्याने पूजा आणि शोनाली नागराणीला प्रपोज केले होते, तेही पूर्ण देसी स्टाईलमध्ये. या एपिसोडमध्ये त्याने जूही परमारला ‘आती क्या खंडाला’ हे गाणे गाऊन प्रपोज केले होते.
हेही पाहा- धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने एका मुलाखतीत आपला अनुभव सांगितला होता. त्याने या शोमध्ये चांगला अनुभव मिळाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, त्याने चाहत्यांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात चपाती आणि भारतीय करी बनवणेही शिकले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सायमंड्सची क्रिकेट कारकीर्द
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा समावेश सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होतो. त्याने ऑस्ट्रेलियाकडून २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले. या धावा करताना त्याने वनडेत १४६२ धावा, कसोटीत ५०८८ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३३७ धावा चोपल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याने कसोटीत २४ विकेट्स, वनडेत १३३ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेतल्या होत्या.