‘१९९९’. हे ते वर्ष होते जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता. ९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान संघात मालिका होणार होती म्हणून दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी रंगतदार मालिका पाहायला मिळेल, असा सर्वांचा विश्वास होता. पण, मुळात पाहिलं तर, भारत-पाकिस्तान संघांमधील प्रत्येक सामन्यासाठी हेच म्हणले जाते.
परंतु, या मालिकेचे वेगळेपण यामुळे होते की, ही द्विपक्षीय मालिका नव्हती. तर या मालिकेत ३ संघ खेळणार होते. २ खरेखुरे क्रिकेट संघ जे एकमेकांविरुद्ध खेळणार होते ते म्हणजे भारत-पाकिस्तान आणि एक राजकीय संघ जो या मालिकेच्या विरुद्ध होता अर्थात शिवसेना (बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष).
९०च्या दशकात शिवसेनेमुळेच पाकिस्तान संघाला भारत दौरे करता आले नाहीत. १९९१-२०००मध्ये दोन्ही संघात जवळपास ३ मालिकेंचे आयोजन होणार होते. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे ते अशक्य झाले. परंतु, १९९८मध्ये दोन्ही देशांत अनुचाचण्या (न्यूक्लियर टेस्ट) करण्यात आल्या होत्या. दरम्यान पाकिस्तान संघ भारतात आलेला होता. दोन्ही संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कसोटी मालिका खेळणार होते. त्यामुळे शिवसेनेने चेतावणी दिली होती की, “जर सामना झाल्यास त्यांचे कार्यकर्ता स्टँड्समध्ये घुसून मैदानावर साप सोडतील.”
६ जानेवारी १९९९ला रात्रीच्या लख्ख काळोखात २५ लोक राजघाट जवळच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये जबरदस्तीने घुसले आणि २२ दिवसानंतर २२ यार्डच्या त्या मैदानावर जिथे ५ दिवस एक सामना खेळला जाणार होता. ती खेळपट्टी खोदून काढली आणि शिवसेनेने हे कृत्य आम्ही केल्याचे मान्य केले आणि म्हटले की, “खेळ हा मित्रांमध्ये खेळला जातो, शत्रूंमध्ये नाही.”
शिवसेनेच्या या कृत्यामुळे भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले. पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर घेण्यात आला. या सामन्यात पहिल्या डावात भारताने बाजी मारली. परंतु, सामन्यात शाहिद आफ्रिदीच्या शतकी खेळीने पाकिस्तानला १२ धावांनी विजय मिळवून दिला. तेव्हापर्यंत दिल्लीतील फिरोजशहा स्टेडियमची खेळपट्टी नव्याने बनवण्यात आली होती. कडक पोलिसं बंदोबस्तसोबत ४ फेब्रुवारीला कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्याची सुरुवात झाली.
या सामन्यातील पहिल्या डावात सामना पूर्णपणे भारताच्या हातात होता. मात्र, दुसऱ्या डावात २५ षटकापर्यंत भारताला एकही विकेट घेता आली नव्हती. परंतु, त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या अनिल कुंबळेने २६.३ षटके गोलंदाजी करत पाकिस्तानच्या १० फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता आणि भारताने तो सामना २१२ धावांनी खिशात घातला होता. त्यामुळे ती कसोटी मालिका १-१वर संपली होती.
त्या दिवशी पत्रकार राजदीप सरदेसाई एक विशेष टीव्ही कार्यक्रम घेणार होते. त्या कार्यक्रमात राहुल द्रविडला गेस्ट एक्सपर्ट म्हणून बोलावले होते. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर एक कार थांबलेली होती, ज्यामध्ये द्रविडला न्यूज स्टुडिओमध्ये यायचे होते. तेवढ्यात सरदेसाईंना द्रविडचा फोन आला.
यावर सरदेसाईंनी द्रविडला विचारले की, “तू अजून निघाला का नाहीस?” यावर द्रविडने उत्तर देत म्हटले, “आज कोणत्या कार्यक्रमात मी पाहुणा म्हणून कसा येवु शकतो? आजचा दिवस अनिल कुंबळेचा आहे. तुम्ही त्यालाच का बोलवत नाही?
यावर राजदीप सरदेसाई म्हणाले, “कुंबळे खूप व्यस्त आहे आणि त्याच्याशी माझे जास्त बोलणे झालेले नाही. अशात शॉर्ट नोटिसवर कसे कोणाला बोलावता येईल.”
यावर द्रविड राजदीप सरदेसाईंना म्हणाला, “मी काहीतरी करतो. ”
यानंतर राहुल द्रविडने कुंबळेची मनधरणी करत त्याला स्टुडिओला आणले. तोपर्यंत सर्वजण स्टुडिओमध्ये द्रविडची वाट पहात होते. शेवटी त्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून अनिल कुंबळेने मुलाखत दिली.
द्रविड आणि कुंबळे हे दोघेही कर्नाटकपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांची मैत्रीही तेवढीच घट्ट होती. तो दिवस कुंबळेचा होता. कारण त्याने इतिहास रचला होता. द्रविडने त्याच्या साफ मनाने स्वत: कुंबळेला आपल्या जागी गेस्ट एक्सपर्ट म्हणून बोलावले होते. द्रविडचा हा स्वभाव सर्वांना भावणारा होता. यावरुन त्याचे क्रिकेट आणि आपल्या संघसहकाऱ्यांबद्दलचे प्रेम आणि आदर दिसून येते.
ट्रेंडिंग घडामोडी-
मी खेळत असतो तर डिव्हिलियर्सला कधीच मिस्टर ३६० म्हणून कुणी ओळखलं नसतं