मग कसं काय क्रिकेटप्रेमींनो आयपीएलची मजा घेताय ना? घेतलीच पाहिजे. मॅच तर तुफान होतायेत पण बाकीच्याही गोष्टी घडतायेत. आपल्याच पुण्याच्या स्टेडियमवर एक कधी न घडलेली घटना घडली की, हो तिच घटना जिथे लैला-मजनू लाईव्ह मॅचमध्ये किस करताना दिसले. आपल्यापैकी अनेकांना वाटलं असेल बापरे हे काय पाहिलंय. इंडियात हे असं कसं होऊ शकतं, पण इतकही शॉक व्हायची काही गरज नाही. कारण, आयपीएलमध्ये हे काय पहिल्यांदाच घडलं नाही. अकरा वर्षांपूर्वी ही असंच घडलेलं, आणि ज्यांनी हे केलं होतं ते काय कोणी सामान्य नव्हते, ते होते लिकर प्रिन्स सिद्धार्थ मल्ल्या आणि बॉलिवूडची शांती दीपिका पदुकोण.
अमाप पैसा असलेले लिकर किंग विजय मल्ल्या जबरदस्त क्रिकेटप्रेमी. आयपीएल अनाउंस झाली आणि त्यांनी बेंगलोर फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली. आपल्याच रॉयल चॅलेंज या लिकर ब्रँडला थोडाफार मॉडीफाय करून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीम तयार झाली. विजय मल्ल्या म्हणजे जबरदस्तच असामी. पैसा असला की काहीही विकत घेता येतं हे मल्ल्या वेळोवेळी दाखवत. त्यामुळेच की काय त्यांच्या आजूबाजूला नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींचा गराडा असायचा. आपल्या टीमला सपोर्ट करायला ते डायरेक्ट कॅटरिना कैफ आणि तिच्यासारख्या अनेक बॉलीवूड सुपरस्टारला घेऊन यायचे. आता किंगफिशर एअरलाइन्समुळे बाकीच्या कॅलेंडर गर्ल्स किती असायच्या याची गणतीच नव्हती.
याच विजय मल्ल्याचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थ माल्या. दिसायला एकदम चार्मिंग अँड हँडसम. प्लस बापाचा पैसा. त्याच्यामुळे सुंदर तरुणी त्याच्याभोवती नसणार असं कसं होऊ शकेल? बापाप्रमाणे पोराची हवा होती. त्याची गर्लफ्रेंड होती साक्षात दीपिका पदुकोण. वन अँड ओन्ली किंग खान शाहरुखच्या अपोजिट ओम शांती ओममधून डेब्यू केलेली दीपिका, तीन-चार वर्षात कॅटरीना आणि प्रियंकाच्या बरोबरीने बॉलीवूड गाजवत होती.
यात सिद्धार्थ आणि दीपिकाचं अफेअर चांगलंच गाजत होतं. फेसबुकवर दोघे फोटो पोस्ट करायचे. आपण कमिटेड असल्याचे दोघांनी मान्य केले. पैसा, फेम सारंकाही दोन्ही बाजूला होतं. आता आपल्या बॉयफ्रेंडचीच आयपीएल टीम आहे म्हटल्यावर दीपिका अधूनमधून टीमला सपोर्ट करायला दिसायची. २०११ची आयपीएल सुरू झालेली. आरसीबी गेलच्या जीवावर सुसाट सुटलेली. अशात आरसीबी आणि केकेआरची मॅच आली. ग्राउंड बेंगलोरच चिन्नास्वामी स्टेडियम. आरसीबीने आपला फॉर्म तसाच ठेवला आणि नाईट रायडर्सवरच राईड केली.
हेही पाहा- जेव्हा दीपिकाने माल्या पुत्राला लाईव्ह मॅचमध्ये किस केला
मॅच जिंकली म्हणून आरसीबी सपोर्टर कल्ला करत होते. इतक्यात कॅमेरा आरसीबीला सपोर्ट करायला आलेल्या व्हीआयपी स्टॅंडवर गेला. स्टॅन्डमध्ये होते द विजय मल्ल्या सिद्धार्थ मल्ल्या, दीपिका अन त्यांचे फ्रेंड्स. सारेजण टाळ्या वाजवत होते आणि इतक्यात सिद्धार्थ दिपीकाला काय झालं काय माहित?. दोघांनी सरळ एकमेकाला बाहुत घेतलं आणि किस केला. साधासुधा नाही लीप लॉक. इम्रान हाश्मीने जो किस पिक्चरमधून फेमस केला तो या जोडप्याने सरळ लाईव्ह टीव्हीवरच करून दाखवला. बरं विशेष म्हणजे विजय मल्ल्या बाजूलाच उभे राहून टाळ्या वाजवत होते.
पुढं काय दोन-तीन दिवस जाम धुरळा उडाला. हे बरोबर होतं की चुकीचं याच्यावर चर्चा झडल्या, पण झालं ते झालं. पुढे काही दिवसातच विजय मल्ल्या दिवाळखोर म्हणून घोषित झाले आणि बिचाऱ्या सिद्धार्थचे पण दिवस फिरले. स्टेटस का सवाल म्हणून दीपिकानं त्याच्याशी ब्रेकअप केलं. तिकडे सिद्धार्थने दीपिकाला क्रेजी वुमन म्हणून आपली बाजू मांडली. दीपिकानं फेसबुकवर रिलेशनशिप स्टेटस कमिटेडवरून सिंगल केलं. माल्यांना देश सोडावा लागला. दीपिकाने आपल बॉलिवूड क्वीन बनण्याच स्वप्न साकार केलं, आणि आता रणवीर सिंगसोबत सुखाचा संसार करतेय. सिद्धार्थ लंडनलाच असतो, पण पुण्यातल्या त्या सामान्य कपलमुळे या हायप्रोफाईल कपलची आठवण आली, म्हणून एवढा खटाटोप.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला
मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल