---Advertisement---

“जेव्हा धोनी खेळपट्टीवर येतो, तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो”, सीएसके प्रशिक्षकांचे भाष्य

On: सोमवार, ऑक्टोबर 11, 2021 6:27 PM
---Advertisement---

रविवारी (१० ऑक्टोबर) आयपीएल २०२१च्या क्वालिफायर १ सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला नमवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा जुना आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने अखेरच्या २ षटकांत आक्रमक खेळ करत चेन्नईला विजयश्री मिळवून दिली. त्यामुळे त्याचे चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी कौतुक केले आहे.

फ्लेमिंग यांनी धोनीचे कौतुक करत म्हटले की, या महान यष्टीरक्षक फलंदाजाला सामन्याचा असा यशस्वी शेवट करताना पाहणे हा खूप भावनिक क्षण होता. धोनीने रविवारी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिला होता. चेन्नईने नवव्या वेळी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

चेन्नईला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती आणि धोनीने या षटकात टॉम करनविरुद्ध तीन चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याआधी षटकात त्याने अवेश खानला मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला होता. धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या.

फ्लेमिंग सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘ही एक उत्तम खेळी होती. जेव्हा धोनी खेळपट्टीवर येतो, तेव्हा आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो, कारण आम्हाला माहित असते की तो दडपणाखाली आहे, त्याच्याकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा असतात आणि त्याने पुन्हा आमच्यासाठी मॅच विनरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये आमच्यासाठी तो खूप भावनिक क्षण होता.’

फ्लेमिंगला विचारण्यात आले की तो धोनीशी तो सामन्याआधी सामन्यानंतर काय बोलतो? तो म्हणाला, बऱ्याच गोष्टीवर चर्चा होत असते. आम्ही सामन्याच्या २० षटकांबाबत अधिक बोलत असतो. तांत्रिक बाबींबद्दल अधिक चर्चा होते. रणनीतीबद्दल चर्चा होत असते, योजना कशा अंमलात आणायच्या आणि सामन्यात कोण जास्त प्रभाव टाकू शकेल, या सर्व गोष्टीं बद्दल चर्चा होत असते.’

धोनीच्या डावापूर्वी ऋतुराज गायकवाडने ७० आणि रॉबिन उथप्पाने ६३ धावा केल्या होत्या. दोघांनी उत्कृष्ट भागीदारी करत चेन्नईच्या विजयाची पायाभरणी केली.

उथप्पाच्या खेळीबद्दल फ्लेमिंग म्हणाला, ‘आम्हाला आमच्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यामुळे ती एक खास खेळी होती. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते.’

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसकेची जोडी जबरदस्त! फाफ-ऋतुराजकडे वर्षातील सर्वोत्तम सलामीवीर बनण्याची संधी

टी२० विश्वचषकात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू करतायेत कसून तयारी, पाहा फोटो

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियममध्ये १०० कॅमेरे, प्रेक्षकांनी लुटला ३६० डिग्री अँगलचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---