मॅथ्यू हेडन, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉंटिंगची क्रिकेट जगतातील जी टेरर गॅंग होती, त्या गॅंगचा एक गुंडासारखा खेळाडू. खरोखरचा गुंड शोभावा अशी सहा फुटांपेक्षा जास्त उंची. डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टारसारखी बॉडी. भेदक नजर असे एकूण व्यक्तिमत्त्व. बॅटिंग करतानाही पहिल्या बॉलपासूनच आला की ‘दे घुमा के’ स्टाईल. क्रिकेटमधील ऑल टाइम ग्रेट ओपनरमध्ये नाव असलेल्या हेडनची आणखी एका गोष्टीमुळे चांगलीच चर्चा झाली. कारण होते मुंगूस बॅटचे.
आयपीएलच्या रणसंग्रामात मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) उतरलेला. धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या ओपनिंगची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. पहिल्या सीझनच्या पहिल्याच मॅचला हेडनने शतकी दणका दिलेला. पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला तो अधीमधी चांगली इनिंग खेळायचा. सीएसके पहिल्या दोन सिझनला सातत्यपूर्ण कामगिरी करत होती. तिसरा सिझन सुरू झाला आणि हेडनची चर्चा आणखी जोरात सुरू झाली.
कारण हेडनने जाहीर केले होते की, तो या वर्षी आयपीएलमध्ये मुंगूस बॅटने खेळणार आहे. आधी आपण जरा मुंगूस बॅटबद्दल जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर या बॅटचा हँडल मोठा होता आणि खालचा मोठा भाग कमी. नेहमीच्या बॅटपेक्षा ही बॅट हलकी होती. पण बॅटच्या बॉटमला जास्त वजन होते. सिक्स फोर हाणायला बॅट एकदम फायदेशीर होती. बॅटच्या मधोमध बॉल लागला की बाहेरच जायचा.
हेडनने जाहीर केल्याप्रमाणे तो मुंगूस बॅटने खेळायला तयार झालेला. पण कॅप्टन धोनी यासाठी काय तयार होत नव्हता. स्वतः हेडन सांगतो की, ‘धोनी मला मुंगूस बॅटने खेळू देत नव्हता. तो मला म्हणाला, तुला जे पाहिजे ते घे पण या बॅटने खेळायचे नाही. पण मी त्याला कन्व्हिन्स केले आणि शेवटी इच्छा नसतानाही धोनीने मला परमिशन दिली.’
अखेर दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध हेडन बहुचर्चित मुंगूस बॅट (mongoose bat) घेऊन मैदानात उतरला. सारे जण या बॅटकडे पाहतच राहिले. दिल्लीने १८६ धावांचे टार्गेट दिल्लीला दिलेले. पण दिल्लीचे बॉलर हेडनला घाबरले की मुंगूस बॅटला हेच समजले नाही. हेडनने मुंगूस बॅटने ४३ बॉलमध्ये ९३ धावा चोपल्या. ९ चौकार आणि सात उत्तुंग षटकार. मुंगूस बॅटने आपली कमाल दाखवली होती. जिथे तिथे तिचीच चर्चा होती. हेडन त्या बॅटने हवा करतच राहिला.
मॅथ्यू हेडन सरळ उठला आणि मुंगूस बॅट घेऊन ग्राउंडमध्ये आला असं घडलं नव्हतं. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार तो दोन अडीच वर्ष त्या बॅटने सराव करत होता. मुंगूस एम एम आय थ्री कंपनीचा तो ब्रँड ॲम्बेसिडर होता. त्याने एक सीझन आयपीएलमध्ये मुंगूस बॅटने खेळण्यासाठी ७० लाखाचे कॉन्ट्रॅक्ट केले होते.
सारं काही ठीकठाक चालले असताना अचानक सुरेश रैनाने एक स्टेटमेंट दिले. तो म्हणाला मी प्रॅक्टीसमध्ये या बॅटने खेळलो. या बॅटने डिफेन्स करता येत नाही. रैनानंतर अनेकांनी हीच प्रतिक्रिया दिली. हळूहळू ही बॅट दिसेनाशी झाली. पहिल्यांदा मुंगूस बॅटचे दर्शन देणाऱ्या हेडनने पुढच्या वर्षीच आयपीएलमधून रिटायरमेंट घेतली.
आयसीसी आणि एमसीसीने ही बॅट लिगल म्हणलेली. नॉर्मल बॅटमध्ये ठराविक भाग स्वीट स्पॉट असतो. तसे मुंगूस बॅटमध्ये पूर्ण ब्लेडच स्वीट स्पॉट होते. आज मुंगूस बॅट कुठेही दिसत नाही. डेनिस लिलींनी जशी क्रिकेटमध्ये ॲल्युमिनियमची कॉमबॅट आणलेली तशी हेडनची ही मुंगूस बॅट टॉक ऑफ द टाऊन ठरली. फरक इतकाच की कॉमबॅट एकाच मॅच पूरती आठवणीत राहिली आणि मुंगूस बॅट अजूनही लीगल असताना कालबाह्य झाली. आता पाहायचं इतकंच की हेडनच्या या मुंगूस बॅटला कोण नवा जन्म देतेय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जरा इकडे पाहा! आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती?
बाप तर बाप, बेटा ही खेळला टीम इंडियासाठी; पाहा क्रिकेटर पिता-पुत्रांच्या जोड्या
क्रिकेट विश्वातील दारूडे क्रिकेटर्स, ज्यांनी घातले राडे, टाका एक नजर