---Advertisement---

‘मी का हसू, मी तर गंभीर आहे’, धोनीने गगनचुंबी षटकार मारताच उतरलं गौतमचं तोंड; नेटकऱ्यांनीही केलं ट्रोल

On: मंगळवार, एप्रिल 4, 2023 9:17 AM
Gautam-Gambhir-And-MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 6वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला गेला. हा सामना 4 वेळच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नईने 12 धावांनी खिशात घातला. रविवारी (दि. 3 एप्रिल) चेपॉकवरील एमएस धोनी याची फटकेबाजी कोणताही क्रिकेट चाहता कधीच विसरू शकत नाही. धोनी लखनऊविरुद्ध स्पर्धेतील दुसरा सामना खेळण्यासाठी अखेरच्या षटकात फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्याने लखनऊच्या गोलंदाजांना खणखणीत 2 षटकार मारले आणि तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. मात्र, यादरम्यान लखनऊ संघाचा मार्गदर्शक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर हा खूपच निराश दिसला. यानंतर सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी गंभीरला ट्रोल केले.

एमएस धोनी (MS Dhoni) विसाव्या षटकात फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्याने फक्त 3 चेंडूंचा सामना केला. मात्र, त्याला पाहण्यासाठी तब्बल 1.7 कोटी चाहते जिओ सिनेमावर तुटून पडले. या आयपीएलमध्ये एकावेळी सर्वाधिक प्रेक्षकांनी धोनीला खेळताना पाहून एक नवीन विक्रमच रचला. यापूर्वी गुजरातविरुद्धच्या सामन्यातही धोनी फलंदाजीसाठी आला होता, तेव्हा 1.6 कोटी लोकांनी जिओ सिनेमावर त्याची फलंदाजी पाहिली होती.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1642919712228265985?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642919712228265985%7Ctwgr%5E1e3a46a34ab9d0200da955d308841eb3ae9c4e0f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fbharat.republicworld.com%2Fsports-news%2Fipl%2Fwhen-dhoni-hit-a-six-camera-found-gautam-gambhir-old-debate-started-on-social-media

https://twitter.com/ChennaiIPL/status/1642920944690950145

तर झाले असे की, धोनीने त्याचा माजी संघसहकारी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या संघाविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन खणखणीत षटकार मारले. तसेच, संघाची धावसंख्या 217 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. धोनीने षटकार मारताच गंभीरही निराश झाला. कारण, या दोन षटकारांमुळे त्याच्या संघासाठी आव्हान आणखी कठीण झाले होते. गंभीरचा चेहरा यावेळी कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले.

एकाने ट्वीट करत लिहिले की, “मी का हसू, मी तर गंभीर आहे.”

https://twitter.com/SaanskarJain/status/1642951071839715328?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642951071839715328%7Ctwgr%5E42cb734c8d3766f6b56d32e45bbc50a2725decf0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fsports%2Fpost%2Fgautam-gambhir-was-talk-of-the-town-after-dhoni-sixes-in-chennai-vs-lucknow-ipl2023-match

दुसऱ्या एकाने लिहिले की, “नेहमी गौतम गंभीर निराश होण्यामागील कारण एमएस धोनीचा षटकार का असतो?”

https://twitter.com/AchajiOk/status/1642922639005036544?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642922639005036544%7Ctwgr%5E42cb734c8d3766f6b56d32e45bbc50a2725decf0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fsports%2Fpost%2Fgautam-gambhir-was-talk-of-the-town-after-dhoni-sixes-in-chennai-vs-lucknow-ipl2023-match

आणखी एकाने असे लिहिले की, “एमएस धोनीने 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी षटकार मारले. दोन्ही वेळा सर्वात जास्त त्रास गौतम गंभीरला झाला.”

https://twitter.com/sagarcasm/status/1642917325367279616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642917325367279616%7Ctwgr%5E42cb734c8d3766f6b56d32e45bbc50a2725decf0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fsports%2Fpost%2Fgautam-gambhir-was-talk-of-the-town-after-dhoni-sixes-in-chennai-vs-lucknow-ipl2023-match

https://twitter.com/rahulmsd_91/status/1642950762060992512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642950762060992512%7Ctwgr%5E42cb734c8d3766f6b56d32e45bbc50a2725decf0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fsports%2Fpost%2Fgautam-gambhir-was-talk-of-the-town-after-dhoni-sixes-in-chennai-vs-lucknow-ipl2023-match

गंभीरचे दुखी होणे स्वाभाविक होते. कारण, तो लखनऊचा सर्वात मोठा सल्लागार म्हणून संघात जोडला गेला आहे. मात्र, यासाठी चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले. चाहत्यांनी धोनीच्या या दोन षटकारांना 2 एप्रिलशी जोडले. 2011मध्ये याच दिवशी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. त्यावेळी धोनीने विजयी षटकार मारत संघाला 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकून दिला होता. याचे श्रेय धोनीला जाते. मात्र, गंभीरनेही त्या सामन्यात 97 धावांची वादळी खेळी साकारली होती. (when ms dhoni hit a six camera found gautam gambhir old debate started on social media take a look)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर धोनीने दिली कर्णधारपद सोडण्याची धमकी! गोलंदाजांवर ठेवली वॉर्निंगची टांगती तलवार

‘इम्पॅक्ट प्लेयर’ तुषार देशपांडेच्या नावे लाजिरवाणा विक्रम! सिराजनंतर आयपीएल इतिहासात केली ही नकोशी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---