मागील काही दिवसांपासून पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध जवळजवळ 100 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या होत्या.
ऋतुराजसाठी हे वर्ष खास ठरले आहे. तो त्याच्या कामगिरीमुळे भारत अ संघाचाही नियमित फलंदाज बनला आहे. तसेच त्याला 2019 आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्स संघातही संधी मिळाली. पण जरी त्याला या आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला त्याच्या हुशारीने प्रभावित केले होते.
2019 च्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्सचा अष्टपैलू आंद्रे रसल तुफानी फॉर्ममध्ये होता. त्याने चेन्नई विरुद्धही त्यांच्याच मैदानावर 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 50 धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने त्याचे सर्व फटके लॉन्ग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेगला मारले होते.
या सामन्यात कोलकताचा हा डाव संपल्यानंतर ऋतुराजने धोनीशी चर्चा केली होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार धोनीशी झालेल्या चर्चेबद्दल ऋतुराज म्हणाला, ‘मी धोनीला म्हणालो, माही भाई, आंद्रे रसल स्कुप आणि पॅडल करत नव्हता. त्यामुळे तू शॉर्ट फाइन लेगचा क्षेत्ररक्षक हलवून डीप स्क्वेअर लेगला लावू शकत होता.’
ऋतुराजच्या या निरिक्षणावर धोनी प्रभावित झाला. त्यावेळी धोनी ऋतुराजला म्हणाला, ‘तूझ्याकडे क्रिकेटची हुशारी आहे.’ त्यानंतर धोनीने शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षण लावण्यामागील कारण सांगितले की तिथे जर रसलच्या बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला तर झेल घेण्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक ठेवला होता.
त्याचबरोबर ऋतुराज आणि धोनी 2016 च्या रणजी ट्रॉफी दरम्यानही भेटले होते. त्यावेळी ऋतुराज झारखंड विरुद्ध महाराष्ट्राकडून पदार्पण करत होता आणि धोनी झारखंडचा मार्गदर्शक होता. त्यावेळीची आठवण सांगताना ऋतुराज म्हणाला, त्याला धोनीला प्रभावित करायचे होते. पण त्याला वरुण ऍरॉनचा बाउन्सर चेंडू लागला आणि त्याचे बोट फ्रॅक्चर झाले.
पण त्यावेळी चेंडू लागल्यानंतरही केदार जाधवने सांगितल्याने त्याने त्याचा खेळणे कायम केले होते. पण अखेर ऋतुराज बाद झाला. त्यानंतर धोनी लंचब्रेकमध्ये त्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याने त्याच्या प्लॅस्टरवर ‘लवकर बरा हो’ असे लिहिले.
यानंतर 2019 आयपीएल दरम्यान ऋतुराजने ही घटना अजूनही लक्षात आहे का असे देखील धोनीला विचारले होते. त्यावेळी धोनीने त्याला सांगितले की हो फक्त स्वाक्षरीच नाही तर ऋतुराजचा शॉटही लक्षात आहे. त्याचबरोबर धोनीने ऋतुराजला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत रहा असेही सांगितले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–हे आहे टीम इंडियाने विश्वचषक न जिंकण्याचे कारण, युवराज सिंगचा मोठा खूलासा
–रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्याबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला…
–‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम