जेव्हा एखादी वरिष्ठ व्यक्ती एखाद्या ज्युनिअर व्यक्तीची प्रशंसा करतो, तेव्हा तो भलताच खुश असतो. थेट मुख्यमंत्र्यांनीच जर एखाद्या खेळाडूची प्रशंसा केली, तर तो खेळाडू किती खुश होत असावा, हे त्यालाच माहिती. असाच काहीसा अनुभव भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने घेतला होता. 33 वर्षीय रवींद्र जडेजा सध्या आपल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. अशातच त्याने त्या किस्स्याबद्दल सांगितले, जेव्हा तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटला होता.
जडेजाने 2010मध्ये घेतलेली भेट
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 2010 मध्ये अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. भारतीय संघ एका सामन्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचला होता आणि त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) होता. जडेजाने सांगितले की, जेव्हा धोनीने माझी भेट मोदींशी करून दिली, तेव्हा त्यांनी हसत हसत एक मजेशीर गोष्ट सांगितली होती.
व्हायरल होतोय व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जडेजाने सांगितले की, “मोटेरा स्टेडिअममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आमचा सामना होता. माही भाई त्यावेळी संघाचे कर्णधार होते आणि त्यांनी मला मोदींशी भेटवले. मोदी म्हणाले की, भाई हा तर आपलाच मुलगा आहे, लक्ष ठेव. त्यांनी हे हसत-हसत म्हटले होते. इतका मोठा व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि वैयक्तिकरीत्या असे बोलतो, तेव्हा एक वेगळीच भावना असते. जेव्हा त्यांनी असे म्हटले, तेव्हा मला खूप चांगले वाटले होते.” व्हायरल होत असलेला व्हिडिओ फ्री प्रेस जर्नलच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
#WATCH: Ravindra Jadeja recalls the time when Modi introduced him to MS Dhoni as 'Apna Ladka Hai'
📽️BJYM | @imjadeja https://t.co/8NLgTIajrk#RavindraJadeja #MSDhoni𓃵 #NarendraModi #ViralVideo #TrendingNow pic.twitter.com/YWFl4r9106
— Free Press Journal (@fpjindia) November 21, 2022
सध्या भारतीय संघातून जडेजा बाहेर
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतही तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाचा भाग नव्हता. जडेजाची कमतरता या संघात पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे. जडेजाने शेवटचा सामना आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध खेळला होता. (when narendra modi said something special to ms dhoni about ravindra jadeja know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ तारखेपूर्वी खेळाडूंना करावी लागेल आयपीएलसाठी नाव नोंदणी, बीसीसीआयने सांगितली तारीख
भारताच्या मोठ्या खेळाडूला करायचीय सूर्यासारखी बॅटिंग; स्वत:च म्हणाला, ‘कधीकधी…’