भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून संबोधले जाते. तसेच तो अचूक डीआरएस घेण्यासाठी देखील ओळखला जायचा. परंतु, विराट कोहली या बाबतीत थोडा कमनशिबी ठरत आहे. ज्याचे प्रत्यय दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघातील फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाचा पहिला डाव ३६३ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला सुरुवातीलाच मोहम्मद सिराजने दोन झटके दिले होते. परंतु त्यानंतर मोहम्मद सिराजमुळे भारतीय संघाने २ रिव्ह्यू गमावले होते.
सिराजमुळे भारतीय संघाने गमावले २ रिव्ह्यू
तर झाले असे की, सिराजने २१ व्या षटकात जो रूट विरुद्ध भारताने पहिल्यांदा डीआरएस घेतला. पंचांनी मागणी फेटाळल्यानंतर मोहम्मद सिराजने विराट कोहलीला डीआरएस घेण्यासाठी राजी केली होते. परंतु, डीआरएस घेतल्यानंतर त्यात स्पष्ट दिसून आले की, चेंडू आणि यष्टीचा संपर्क होत नव्हता. त्यामळे भारतीय संघाला हा रिव्ह्यू गमवावा लागला होता.
त्यानंतर पुढील षटकात पुन्हा एकदा मोहम्मद सिराजने जो रूटला बाद देण्याची मागणी केली होती. परंतु, पुन्हा एकदा पंचांनी ही मागणी फेटाळून लावली होती. यावेळी पुन्हा एकदा मोहम्मद सिराजने विराट कोहलीला रिव्ह्यू घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रिषभ पंत विराट कोहलीला रिव्ह्यू घेऊ नको असे सांगण्याचा प्रयत्न करत होता. तरी देखील विराटने रिव्ह्यू घेतला आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू गमावला.
सिराजच्या म्हणण्यावर विराट कोहलीने आत्तापर्यंत १० वेळेस डीआरएसचा वापर केला आहे. यादरम्यान एकच वेळेस डीआरएस यशस्वी ठरला आहे. तर २ वेळेस अंपायर्स कॉल आला, तसेच ७ वेळेस डीआरएस अयशस्वी ठरला आहे.(When Rishabh pant tries to stop Virat Kohli for taking DRS)
Mohammad Siraj convinced Virat Kohli to take the review of Joe Root, but Rishabh Pant was denying. pic.twitter.com/WepEASpDWH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 13, 2021
सर्वात जास्त अयशस्वी डीआरएस घेण्याच्या बाबतीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २४ वेळेस डीआरएसचा वापर केला आहे.यापैकी ३ वेळेस भारतीय संघाचा डीआरएसमध्ये यश मिळाले आहे. २०१९ पासून डीआरएसमध्ये सर्वाधिक वेळा अपयशी ठरलेल्या संघांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर या यादीत श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार किंग कोहलीला बाद करण्याच्या ‘मास्टर प्लॅन’बद्दल स्वतः गोलंदाजाने केला खुलासा
लॉर्ड्स कसोटीत १४ धावा करताच रूटची ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, आता केवळ कूक आहे पुढे
विक्रमी अँडरसन! लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेत ‘या’ विक्रमाच्या यादीत आर अश्विनला टाकले मागे