---Advertisement---

‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय

On: सोमवार, ऑक्टोबर 10, 2022 6:04 PM
Shahbaaz-Ahmed
---Advertisement---

रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 7 विकेट्सने धूळ चारली. तसेच, मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. भारताच्या या विजयात अष्टपैलू शाहबाज अहमद याने मोलाचे योगदान दिले. त्याने या सामन्यातून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 274वा खेळाडू बनला. या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण शाहबाजने गोलंदाजीने प्रभावित केले. शाहबाजने एक विकेट घेतली. मात्र, त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चला त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया…

शाहबाज अहमद (Shahbaaz Ahmed) याने त्याच्या क्रिकेटची आवड जपण्यासाठी अनेक समस्यांचा सामना केला. विशेष म्हणजे, त्याला त्याच्या वडिलांकडून अल्टीमेटम मिलाले होते की, ‘काहीतरी कर, नाहीतर परत येऊ नको.’ शाहबाज हा ड्रॉपआउट इंजीनियरिंगचा विद्यार्थी होता. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याच्यावर खुश नव्हते. इतकेच नाही, तर तो हरियाणा सोडत कोलकाताला निघून गेला होता. कारण, त्याला त्याची कारकीर्द इंजीनियरिंगमध्ये नाही, तर क्रिकेटमध्ये घडवायची होती. यादरम्यान त्याच्या वडिलांनी त्याला चेतावणी दिली होती की, ‘काहीतरी करूनच ये, नाहीतर येऊच नको.’

माध्यमांशी बोलताना शाहबाज अहमद याचे वडील अहमद जान (Shahbaaz Ahmed Father Ahmed Jan) आणि त्याची आई अबनाम यांनी त्याच्या क्रिकेटप्रवासाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. आई म्हणाली की, “त्याने काहीतरी मोठे करण्याचा निश्चय केला. त्याच्या कॉलेजच्या शिक्षकांनीही सांगितले की, इंजीनियरिंग सोडणे हे चुकीचे होते. कारण, तो एक चांगला विद्यार्थी होता. शाहबाजने त्याच्या विभागप्रमुखांना म्हटले होते की, ‘एक दिवस तुम्ही मला माझी पदवी द्याल आणि माझा सत्कारही कराल.’ विशेष म्हणजे, मागील वर्षी असेच झाले होते.” शाहबाजच्या वडिलांनी सांगितेल की, “त्याला जेवण कसे बनवायचे माहिती नव्हते, त्यामुळे त्याचे काम भांडी स्वच्छ करण्याचे होते. मी त्याला एकदा म्हटले की, काहीतरी करूनच ये, नाहीतर परत येऊ नको.”

https://twitter.com/BCCI/status/1579016415839145984

हे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

घरगुती क्रिकेटमधील कामगिरीमुळे आयपीलमध्ये सामील
शाहबाज अहमद याला तपन मेमोरियल क्लबमध्ये आणण्यासाठी झटणारे प्रतिम चौधरी होते. त्यानंतर प्रतिभावान शाहबाजने त्याच्या वाटा स्वत: बनवल्या. तो घरगुती क्रिकेटमध्ये बंगाल संघासाठी खेळला. यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली. याच दमावर तो आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबी संघात निवडला गेला. त्याने 2020पासून ते 2022पर्यंत त्याने 29 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने 8.58च्या इकॉनॉमी रेटने एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान 7 धावा देत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘यॉर्कर किंग’ बुमराहला कपिल पाजींनी करून दिली राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव, एकाच ओळीत केले ‘क्लीन बोल्ड’
याचं करायचं काय? सराव सामन्यातही सपशेल अपयशी ठरला रिषभ; 17 चेंडू खेळून पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---