आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना हिंदी समालोचन कक्षात बॉलीवूड स्टार शाहरुख खान आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवागबरोबर समालोचन करताना दिसला. यावेळी १० षटकांनंतर शाहरुख खान आणि सेहवाग यांनी आपल्या बसायच्या जागा बदलल्या.
समालोचन करत असलेल्या आकाश चोप्राने शाहरुख खान आणि वीरेंद्र सेहवाग यांना प्रश्न विचारला की १० षटकांनंतर सामन्यात पाकिस्तानच्या किती धावा झालेल्या असेल.
यावर किंग खानने ४० च्या आसपास धावा होतील आणि २ विकेट्स गेलेल्या असेल असे भविष्य वर्तविले. तर सेहवागने १ विकेट आणि ४०-५० च्या आसपास धावा असे सांगितले.
१० षटकांनंतर पाकिस्तान संघाने मजबूत सुरवात करत ५६ धावा केल्या होत्या आणि विशेष म्हणजे पाकिस्तानची एकही विकेट पडलेली नव्हती.
त्यावर शाहरुख खानने वीरूला जागा बदलण्याचा सल्ला दिला आणि दोघांनी जागा बदलली. जागा बदलून तरी काही होईल अशी अपेक्षा शाहरुखने व्यक्त केली तर मला नाही वाटत असं काही सध्या तरी होईल अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.
बाजूला बसलेला आकाश चोप्रा हा सर्व प्रकार शांत बसून पाहत होता.