कॅरेबियन प्रीमियर लीग ही जगातील बऱ्याच टी२० लीग पैकी एक. आयपीएलनंतर चांगली लोकप्रिय असणारी ही एक लीग. यात बऱ्याच देशातील क्रिकेटपटू भाग घेतात. परंतु मुख्य आकर्षण हे नेहमीच स्थानिक क्रिकेटपटू राहिले आहेत.
आयपीएल किंवा नेटवेस्ट टी२० ब्लास्टप्रमाणेच या लीगमध्येही अनेक करामती होतात. या सर्व करामती कॅरेबियन प्रीमियर लीग अधिकृत ट्विटर अकाउंट अर्थात @CPL वरून प्रसिद्धही केल्या जातात. काल या अकाउंटवरून असाच एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे.
पोलार्ड हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजाने मारलेला झेल त्याच्या बाजूला येतो. पोलार्ड उंच उडी मारून हा झेल घेण्याचा प्रयत्न करतो परंतु खूपच उंचावरून असल्यामुळे तो हा झेल घेऊ शकत नाही. सीमारेषेच्या बाहेर जो कॅमेरामॅन उभा असतो त्याकडे हा चेंडू जातो आणि आपले काम सुरु असताना तो दोन हातांनी अलगद तो झेल घेतो. हा विडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
पहा हा संपूर्ण विडिओ:
Six! Caught by the cameraman!#CPL17 #BiggestPartyInSport #SKPvBT pic.twitter.com/voVuzW52BR
— CPL T20 (@CPL) August 19, 2017