क्रिकेटमध्ये निर्माण झालेल्या ताणतणावामुळे खेळाडू अनेकदा टोकाची भूमिका घेत क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या किंवा आत्महत्या केल्याचा घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 32 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जोसेफ पाट्रीज यांनी छोट्याश्या कारणावरून आत्महत्या करत जीवन संपवले. त्यांच्या या आत्महत्येनंतर संपूर्ण क्रिकेट जगत हादरून गेले.
पोलिस स्टेशनमध्ये झाडली गोळी
झाले असे की, 7 जून 1988 रोजी जोसेफ हरारे येथील एका हॉटेलमध्ये बसले होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. दारू पिल्यानंतर त्या हॉटेलचे बिल देऊ न शकल्याने त्यांना हरारे पोलिसांनी अटक केली आणि पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. रागाच्या भरात जोसेफ यांनी पोलिस स्टेशनमध्ये स्वतःवर बंदूक चालवली आणि आयुष्य संपवले. त्यांच्या या कृत्यानंतर अनेकांना धक्का बसला.
अशी राहिली होती क्रिकेट कारकिर्द
आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्यांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघाच्या नाकात दम आणला होता. जोसेफ आफ्रिका संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड सारख्या क्रिकेट पॉवर्स मानल्या जाणार्या संघाविरुद्ध आपल्या संघाचा तो ब्रह्मास्त्र म्हणून ओळखले जायचे. अवघ्या 11 कसोटी सामन्यात 44 बळी घेतले. यात त्यांनी 91 धावा देत 7 गडी बाद करत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली.
जोसेफ यांनी आपल्या छोट्याशा क्रिकेट करिअरमध्ये 3 वेळा 4 गडी बाद करण्याचा तसेच 3 वेळा 5 गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात एक गडी बाद करता आला तर दुसऱ्या सामन्यात पाच आणि तिसऱया सामन्यात नऊ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. इंग्लंडविरुद्ध त्यांनी 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 6 गडी बाद केले. त्यानंतर ते कायमचे संघाबाहेर राहिले.