भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर सोमवारी (दि. 10 जुलै) 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. गावसकरांनी त्यांच्या फलंदाजीने अनेक चाहत्यांची मने जिंकली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले, पण आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटवर राज्य गाजवलेल्या गावसकरांची लव्ह स्टोरी देखील तशीच खास आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊयात…
गावसकरांनी त्यांची स्वाक्षरी घ्यायला आलेल्या मुलीबरोबरच पुढे जाऊन लग्न केले होते. आता त्यांच्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मार्शनील (Marshneil Gavaskar) आहे.
अशी झाली पहिली ओळख –
साल 1973 साली सुनील गावसकर आणि मार्शनील (Sunil Gavaskar And Marshneil) यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी मार्शनील दिल्लीमध्ये लेडी श्रीराम कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण घेत होत्या. त्या मुळच्या कानपूरमधील आहेत. 1973मध्ये त्या दिल्लीमध्ये एक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये गावसकर स्टुडंट्स गॅलरीमध्ये उभे होते. त्याचवेळी मार्शनील त्यांच्याकडे स्वाक्षरी घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी गावसकर स्वाक्षरी देण्याबरोबरच त्यांचे हृदयही त्यावेळी मार्शनील यांना देऊन बसले.
त्यानंतर त्यांनी मार्शनील यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली. काही रिपोर्ट्सनुसार, सुनील गावसकर (Sunil Gavaskar) कानपूर येथे मार्शनील यांच्या घराच्या आसपासही फेरफटका मारायचे. ते कानपूरमध्ये त्यांच्या मित्राच्या घरीही राहायचे. त्यावेळी सुरुवातीला त्यांच्या मित्राला गावसकरांचा हेतू माहित नव्हता.
हेही वाचा- घातक वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय का खेळायचे गावसकर? ‘हे’ होतं कारण
पण गावसकरांनी मार्शनील यांना त्यांची जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी कानपूर कसोटी सामन्यासाठी मार्शनील आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्राच्या मदतीने आमंत्रित केले. तो सामना संपल्यानंतर गावसकरांनी मार्शनील यांना लग्नाची मागणी घातली. मार्शनील यांनीही होकार दिला. तसेच, त्यांचे कुटुंबीयदेखील या नात्यासाठी तयार झाले. पुढे 23 सप्टेंबर 1974, ला सुनील गावसकर आणि मार्शनील यांनी लग्न केले. (when sunil gavaskar fell in love with a fan who asks for his autograph)
महत्वाच्या बातम्या-
त्रिनिदादमधील मुलांची नावे सुनील का? गावसकरांच्या मित्रानेच केलेला मोठा खुलासा
नातेवाईकांच्या समजदारीमुळे वाचले सुनील गावसकर, नाहीतर बनले असते थेट मच्छिमार