1. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2006, ओव्हल
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात 2006 साली पार पडलेल्या एका कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी डॅरेल हेअर या पंचांनी पाकिस्तानकडून परवानगी नसलेल्या पद्धतीने चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी इंग्लंडला 5 पेनल्टी धावा देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे चहापानाच्या विश्रांतीनंतर नाराज असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात येण्यास नकार दिला होता. जवळजवळ 20 मिनिटांनंतर हेअर आणि बिली डॉक्ट्रोव्ह हे पंच इंग्लंडच्या फलंदाजांसह मैदानात गेले आणि त्यांनी बेल्स हटवून सामना संपल्याचे घोषित केले. हा सामना त्यांनी इंग्लंडला बहाल केला.
असा प्रकार क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला. पाकिस्तानचा संघ संध्याकाळी पुन्हा मैदानात आला परंतू पंचांनी तो निर्णय राखून ठेवला.
2 श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, 1999, अॅडलेड
1999मध्ये आॅस्ट्रेलियाच्या अॅडलेड मैदानावर झालेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे सामन्यातही श्रीलंकेकडून असा प्रकार पहायला मिळाला होता.
त्यावेळी स्क्वेअर लेगला उभ्या असणाऱ्या रॉस एमर्सन या पंचांनी श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या एका चेंडूवर नो बॉलचा निर्णय दिला होता.
त्यामुळे श्रीलंकेचा त्यावेळचा कर्णधार अर्जूना रणतूंगाने पंचांबरोबर बऱ्याचवेळ चर्चा केली. त्यानंतर त्याने श्रीलंकेच्या खेळाडूंना घेऊन मैदानातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे सर्व खेळाडू बांउंड्री लाईनपाशी येऊन थांबले.
त्यानंतर सामना अधिकारी, श्रीलंका संघाचे व्यवस्थापक रणजीत फर्नांडो आणि रणतुंगामध्ये चर्चा झाली. यामुळे 12 मिनिटे खेळ थांबला. मात्र त्यांतर पुन्हा खेळ सुरु झाला. पण रणतुंगानेही नंतर मुरलीधरनला ज्या एन्डला एमर्सन उभे होते. त्या एन्डपासुन गोलंदाजी करण्यास बोलावले आणि त्यांना विकेटच्या जवळ उभे रहाण्यास सांगितले. ज्यामुळे त्यांना निर्णय घेणे कठीण जाईल.
हा सामना श्रीलंकेने 303 धावांचा पाठलाग करत जिंकला होता.
3 पाकिस्तान विरुद्ध भारत, 1983, बेंगलोर
पाकिस्तान आणि भारत या दोन प्रतिस्पर्धी संघात नेहमीच चुरस पहायला मिळते. पण 1883 साली बेंगलोरमध्ये या दोन संघात खेळल्या गेलेल्या कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. पण त्याआधी या सामन्याच्या शेवटच्या दिवशी चांगलेच नाट्य रंगले होते.
या सामन्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे मैदान घसरडे झाल्याने पाकिस्तानचा कर्णधार झहीर अब्बास नाखूश होता. या सामन्यातील पहिला डावही पावसामुळे सामन्याच्या शेवटच्या दिवशी पूर्ण झाला.
या दिवशी 77 षटके टाकणे तसेच शेवटच्या एका तासात 20 षटके टाकणे बंधनकारक होते. त्यावेळी लिटील मास्टर सुनिल गावस्कर त्यांच्या 28 व्या कसोटी शतकाच्या जवळ होते. त्याचवेळी शेवटच्या तासाच्या 14 व्या षटकानंतर आणि सामन्यातील 77 षटके संपल्याने अब्बास मैदानावरील पंचांशी चर्चा न करताच संघाबरोबर मैदानाबाहेर गेला.
पण शेवटच्या तासात 20 षटके गोलंदजी करणे आवश्यक होते. अब्बासच्या या कृतीसाठी स्वरुप किशन आणि माधव गोथसोकर या पंचांनी त्याला जर तो परत मैदानात आला नाही तर हा सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लावला जाईल असा निर्वानीचा इशारा दिला.
यानंतर पाकिस्तान संघ मैदानात परत आला आणि गावस्कारांनी त्यांचे शतकही पूर्ण केले. मात्र हा सामना अणिर्नित राहिला.
4 भारत विरुद्ध पाकिस्तान, सहीवाल, 1978
1978 साली भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातही भारताकडून काहीसा असाच प्रकार पाहायला मिळाला होता. ती वनडे मलिका 1-1 अशी बरोबरीत होती.
भारताने पाकिस्तानला 40 षटकाच 7 बाद 205 धावांवर रोखले होते आणि त्यानंतर भारत 40 षटकात विजयासाठी 206 धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला.
त्यावेळी शेवटचे 3 षटके बाकी असताना भारताला विजयासाठी 24 धावांची गरज होती. अंशुमन गायकवाड 78 धावांवर आणि गुंडप्पा विश्वनाथ 8 धावांवर नाबाद होते. 38 व्या षटकात गोलंदाजीला सर्फराज नवाज आला.
या षटकात त्याने पहिल्याच चेंडूवर टाकलेला बाउंसर जवळ जवळ 6 फूट उंची असलेल्या गायकवाड आणि यष्टीकक्षक वासिम बारी यांच्या डोक्यावरून गेला. पण तरीही ख्याद हयात आणि जावेद अख्तर या पंचानी कसलाही निर्णय दिला नाही.
त्या षटकातील पुढचे तीन चेंडूही त्याने तसेच टाकले. त्यामुळे भारताचे त्यावेळचे कर्णधार बिशन सिंग बेदींनी भारताच्या फलंदाजांना या प्रकरणाच्या निषेधार्थ परत बोलावून घेतले. यामुळे सामना पाकिस्तानला बहाल करण्यात आला.
एक संघ मैदानाबाहेर गेल्याने प्रतिस्पर्धी संघाला सामना बहाल करण्याची ती पहिलीच वेळ होती.
5. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज, 2018
सेंट लुसिया येथे विंडिज विरुद्ध श्रीलंका संघात 14 ते 18 जुन 2018 या काळात सेंट ल्युसिया येथे कसोटी सामना झाला होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सामना पंचांनी चेंडू बदलण्याच्या घेतलेला निर्णय मान्य नसल्याने श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने खेळायला येण्यास नकार दिला होता.
त्यानंतर बऱ्याच गोंधळानंतर आणि चर्चेनंतर दोन तास उशिराने पुन्हा खेळ सुरु झाला. पुढे हा सामना अनिर्णित राहिला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तब्बल ८ वर्षांनी सचिननी ओपन केली होती ती खास शाॅंपेन, कारणही होते तसेच खास
-भारतीय क्रिकेटपटू आणि काऊंटी क्रिकेटचे नाते काही खास, पहा कोण कोण खेळलंय आजपर्यंत काऊंटी
-धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल