भारताचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या आशिया चषक 2023 खेळत आहे. या दोघांनीही आशिया चषकात आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला आहे. असे असले तरी, विराट आणि रोहितचे वाढते वय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा दिग्गज जो रुट याने खास प्रतिक्रिया दिली.
विराट कोहली (Virat Kohli) सध्या 34, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 36 वर्षांचा आहे. असे असले तरी, दोन्ही फलंदाज आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत. रोहित शर्मा याने आशिया चषकात तीन अर्धशतके केली असून विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्ध सोमवारी शतक (122*) ठोकले. सोबतच रोहितच्या नेतृत्वात संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही पोहोचला आहे. दोन्ही खेळाडूंचा फॉर्म आणि अनुभव पाहता त्यांना संघातून बाहेर करणे सध्या तरी शक्य दिसत नाही. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात रोहित आणि विराटने विश्रांती घ्यावी आणि युवा खेळाडूंनी संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर जो रुट (Joe Root) याला नुकताच एक प्रश्न विचारला गेला.
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार या प्रश्नवर म्हणाला, “मला वाटते विराट आणि रोहितसारख्या फलंदाजांना केवळ त्यांच्या वयामुळे बाहेर काढणे संघासाठी खतरणाक ठरू शकते. तुम्ही पाहा खूप वर्ष टी-20 क्रिकेट खेळला. जगात अनेक असे खेळाडू राहिले आहेत, जे दीर्घकाळ खेळले आहेत. खासकरून टी-20 क्रिकेटमध्ये त्यांचे प्रदर्शन चांगले राहिले आहे.” रुटने यावेळी त्याचा राष्ट्रीय संघातील सहकारी जेम्स अँडरसन (James Anderson) याचे उदाहरण दिले. अँडरसन 41 वर्षांचा असून आजरी नवख्या गोलंदाजांपेक्षा अधिक प्रभाविपणे संघासाठी भूमिका पार पाडतो.
“जेम्स अँडरसन एक योग्य उदाहरण आहे. त्याचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आङे. तरीही तो अप्रतिम प्रदर्शन करतो. त्याचे वय जास्त आहे म्हणून आम्ही त्याला संघातून बाहेर केले नाही, यासाठी मी आमच्या संघाला भाग्यशाली मानतो. तो आजही खेळत आहे आणि आजही आमच्या गोलंदाजी आक्रमाणाचे नेतृत्व करतो. आमच्यासाठी त्यांचा अनुभव आणि गुणवत्ता खूप महत्वाची आहे. एक प्रथिभा आणि अप्रतिम खेळाडू म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो,” असे रुट पुढे म्हणाला. (When the issue of Rohit-Virat’s age came up, the English legend gave the example of Anderson)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! नसीम शहा आशिया चषकातून बाहेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचे होणार पदार्पण
धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’