क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसात अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपापला सर्वकालिन सर्वोत्तम ११ जणांचे संघ निवडले आहेत. यात सिंगापूरच्या टीम डेव्हिडचाही समावेश आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या डेव्हिडने देखील गेल्यावर्षी आपला सर्वोत्तम ११ जणांचा टी२० संघ निवडला होता. विशेष म्हणजे यात त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला संधी दिली नव्हती.
टीम डेव्हिड (Tim David) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याने जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच आयपीएल २०२२ साठी (IPL 2022) मुंबई इंडियन्सने त्याला ८.२५ कोटींची किंमत मोजल आयपीएल लिलावादरम्यान आपल्या संघात घेतले होते. त्यानेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे. पण, असे असतानाच तो त्याने गेल्यावर्षी निवडलेल्या टी२० संघामुळे चर्चेचे कारण बनला आहे.
टीम डेव्हिडने क्रिकेटएनमोरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा सर्वकालिन सर्वोत्तम टी२० संघ (All time best t20 Team) निवडल्याचे दिसते. या संघात त्याने एमएस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहलीलाही (Virat Kohli) स्थान दिले होते. पण, रोहितला (Rohit Sharma) मात्र, स्थान नव्हते. योगायोग म्हणजे हा संघ निवडल्यानंतर एकवर्षाने आता टीम डेव्हिड रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळला.
टीम डेव्हिडने त्याच्या सर्वकालिन सर्वोत्तम टी२० संघात सलामीला ख्रिस गेल आणि शेन वॉटसन यांना संधी दिली होती. त्याने तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला जागा दिलेली आणि चौथ्या क्रमांकावर त्याने एबी डिविलियर्सला संधी दिली होती. त्याचबरोबर धोनीला त्याने पाचव्या क्रमांकावर ठेवले होते, तर कायरन पोलार्डला सहाव्या क्रमांकवर स्थान दिले होते.
अष्टपैलू म्हणून त्याने आंद्र रसेल, ड्वेन ब्रावो आणि राशिद खास यांना निवडले होते. तसेच सुनील नारायणला त्याने फिरकीपटू म्हणून संधी दिली होती, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल मार्शलाही त्याने आपल्या संघात स्थान दिले होते.
टीम डेव्हिडची आयपीएल २०२२ मधील कामगिरी
टीम डेव्हिडच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ७ सामन्यांत ३८ च्या सरासरीने १५२ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चौकार ठोकल्यानंतर विराटने केले पंड्याला स्लेज; तोंड लपवताना दिसला गुजरातचा कर्णधार
विराटची बटलरबरोबर अशी काय चर्चा झाली की, दोन्ही क्रिकेटर्सला अवरले नाही हसू, घ्या जाणून
मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये केली तोडफोड, तर बीसीसीआयचा चढला पारा; लगावली फटकार