---Advertisement---

विराट कोहलीला रोखण्यासाठी असा आहे न्यूझीलंडचा खास प्लॅन

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 3:46 PM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी मोठ्या धावा करण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडने खास रणनीती आखली आहे. याबद्दल न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमने माहिती दिली.

लॅथम म्हणाला, ‘विराट फलंदाजीसाठी बाहेर येईल तेव्हा आम्ही सज्ज असू. तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि म्हणूनच बऱ्याच काळापासून तो एक अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. तसेच जर खेळपट्टीवर चेंडूला मुव्हमेंट मिळत असेल, तर आम्ही त्याचा फायदा घेऊ.’

त्याचबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंड संंघात वेगवान गोलंदाज नील वॅगनर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्या संघात परत येण्याने गोलंदाजीला आणखी मजबूती मिळेल, असेही लॅथम म्हणाला.

लॅथम म्हणाला, ‘मी अद्याप त्याला पाहिले नाही, परंतु जेव्हा तो सरावासाठी येईल तेव्हा तो सामना खेळण्यासाठी उत्सुक असेल. आमच्यासाठी तो बर्‍याच वर्षांपासून दर्जेदार कामगिरी करत आहे.’

तसेच लॅथमने असेही सांगितले की हेगली ओव्हल स्टेडियमची खेळपट्टी वॅगनरच्या गोलंदाजी शैलीला मदतशीर आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा या खेळपट्टीवर सामना करणे कठीण असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---