विराट कोहली सध्या भारताच्या तिन्ही प्रकारच्या (कसोट, एकदिवसीय आणि टी २०) क्रिकेट संघांचे नेतृत्व करतो. तसेच आयपीएमध्ये तो मागच्या सात वर्षांपासून राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नियमित कर्णधार आहे. अशातच कोहतीने मागच्या आठवड्यात एक मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे, तो आगामी टी २० विश्वचषक संपल्यानंतर भारतीय टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. तसेच त्याने १९ सप्टेंबरला आणखी एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्याने आयपीएल २०२१ हा त्याच्या आरसीबीचा कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असणार असल्याचे घोषित केले आहे.
कोहलीच्या या निर्णयाची माहिती आरसीबीने एक व्हिडिओ शेअर करून दिली. व्हिडिओत विराट त्याच्या या निर्णयाची माहिती देत आहे. तसेच जोपर्यंत आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत आरसीबीमध्येच खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याने स्वत:ला कामाच्या ताणातून विश्रांती मिळण्यासठी हा निर्णय घेतला आहे.
विराटच्या या निर्णयानंतर आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबीचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत जे पुढच्या हंगामामध्ये आरसीबीचे नेतृत्व करू शकतात.
एबी डिव्हिलियर्स
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर पुढच्या हंगामात आरसीबीचे कर्णधारपद स्विकारू शकतो. एबी डिव्हिलियर्स ३७ वर्षाचा असला तरी त्याच्या फलंदाजीकडे पाहून त्याच्या वयाचा अंदाज येत नाही. हिव्हिलियर्सने त्याच्या नेतृत्वात २०१५ मध्ये विश्वचषकात दक्षिण अफ्रिका संघाला उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. विराटनंतर आरसीबीचे नेतृत्व करण्यासाठी तो सर्वात पहिला दावेदार असेल.
ग्लेन मॅक्सवेल
आरसीबीने यावर्षी त्यांच्या संघात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला सामील केले आहे. एबी डिव्हिलियर्ससोबत आणखी एक विस्फोटक फलंदाज संघात असावा, या कारणास्तव त्याला आरसीबीने संघात सामील केले आहे. त्याने यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्याकडे बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स संघाच्या कर्णधारपदाचा अनुभवही आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामामध्ये १४४.८ च्या स्ट्राइक रेटने २२३ धावा केल्या आहेत.
देवदत्त पडिक्कल
आरसीबी संघातील युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलही संघासाठी कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. आरसीबीचा सलामी फलंदाज पडिक्कचे आतापर्यंतचे रेकाॅर्ड पाहता चांगले आहे. आरसीबी भविष्यात पडिक्कलकडे मोठी जबाबदारी देऊ शकते. भविष्यात तो संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
मितालीच्या हेल्मेटवर लागला बाऊंसर आणि भारतीय चाहत्यांच्या काळजात झाले धस्स; पाहा व्हिडिओ
दुबईत रंगणार ‘नॉर्थ डर्बी’! वाचा पंजाब-राजस्थानमध्ये आजवर कोण ठरलय वरचढ?






