---Advertisement---

लईच भारी! जेव्ह पती विराटला आपल्यासाठी गाणं म्हणताना भावूक झाली होती अनुष्का शर्मा, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: गुरूवार, जून 17, 2021 1:00 AM
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते खूप जुने आहे, अनेक क्रिकेटपटूंनी बॉलीवूडच्या अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. हे जोडपं क्रिकेट विश्वात व बॉलीवूडमध्ये दरवेळेस चर्चेत असतं. नुकताच त्यांचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाचा हा ४ महिन्याचा इंग्लंड दौरा आहे. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिका देखील इंग्लडमध्ये आहे. वामिकाचा जन्म याच वर्षी ११ जानेवारीला झाला होता, ती आता पाच महिन्याची झाली आहे.

विराट आणि अनुष्का ही जोडी भारतातील सर्वात चर्चित जोड्यांमधून एक आहे. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली येथील टस्किनमध्ये एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ वायरल झाले होते. एक असाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात विराट कोहली त्याची पत्नी अनुष्कासाठी एक सुंदर गाणं म्हणत आहे आणि अनुष्का भावुक झाली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर ‘द रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय कर्णधार विराट गाणे ही छान गातो. त्याची ही लपलेली प्रतिभा लग्ना अगोदर सगळ्यांसमोर आली होती. आपल्या लग्नाआधी विराटने अनुष्कासाठी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ गाणं गायल होत. त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवाराने टाळ्यांनी त्याचे कौतुक केले होते. त्या व्हिडिओमध्ये कॅमेरा जेव्हा अनुष्काकडे जातो तेव्हा अनुष्का खूप भावुक होतांना दिसली. (When Virat Kohli sang this song Anushka Sharma gets teary eyed, Video Viral)

Captain kohli can sing, See anushka's REACTION..

अनुष्का शर्माने ‘रब ने बना दी जोडी’ (२००८) शाहरुख खानसोबत आपल्या बॉलीवूड कारकिर्दीची सुरवात केली. याच वर्षी विराटने भारतासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अनुष्काने सुलतान, बँड बाजा बारात, दिल धड़कने दो आणि ए दिल है मुश्किल, सुई धागा सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सन २०१३ मध्ये आपला भाऊ करण शर्मासोबत तिने एक प्रोडक्शन हाऊस चालू केले. अनुष्काने NH १०, परी आणि फिल्लौरीसारखे चित्रपट दिग्दर्शिक केले आहे. मागील दोन वर्षात तिच्या प्रोडक्शन हाऊसने ‘पाताल लोक’ आणि ‘ बुलबुल’ सारख्या वेब सिरीजही बनवल्या.

महत्वाच्या बातम्या

शेवटी दिवस आलाच! आज होणार भारत-इंग्लंड महिला संघांची लढत, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना माझ्यासाठी विश्वचषकाहून कमी नाही,’ पुजाराने फुंकले रणसिंग

‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---