क्रिकेटविश्वात आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांचा घाम काढणारा फलंदाज म्हणजेच भारतीय संघातील माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग. सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाच्या विजयात अनेकदा योगदान दिले होते. तो आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हे दोघे अनेकदा भारतीय संघासाठी एकत्र खेळले होते. हे दोघेही खेळाडू भारतीय संघाच्या महत्वाच्या फलंदाजांपैकी एक होते, ज्यांनी २००७ चा टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११चा एकदिवसीय जागतिक विश्वचषक जिंकला होता.
सन २००७ मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंग धोनीमधील वादाच्या अफवाना उधाण आले होते. कारण २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात संघातून सेहवागला वगळण्यात आले होते. दोघांनीही या अफवांना सार्वजनिकरित्या नकार दिला होता आणि स्पष्ट केले होते की त्यांचे चांगले संबंध आहेत. सेहवागला वगळल्यानंतर युसूफ पठाणला अंतिम सामन्यात संघात स्थान देण्यात आले होते
सेहवाग त्या भारतीय संघाचा भाग होता ज्याने २००७ मध्ये पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. पुढे २८ वर्षांनंतर २०११ मध्ये जिंकलेल्या एकदिवसीय विश्वविजेत्या संघात त्याचा समावेश होता. या स्पर्धेत सेहवागने ८ सामन्यांत ३८० धावा केल्या आणि भारताच्या विजेतेपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
निवृत्त झाल्यानंतर सेहवागने पुन्हा एकदा धोनीबरोबर झालेल्या वादाच्या अफवांवर प्रकाश टाकून स्पष्टीकरण दिले होते. काही चाहत्यांचा असा विश्वास होता की, विश्वचषकानंतर दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही धोनी आणि सेहवागमधील संबंध ठीक नाहीत. २०१८ मध्ये सेहवागने धोनीला वाढदिवशी शुभेच्छा दिल्या होत्या आणि फेसबुकवर त्याच्याबरोबर एक फोटो पोस्ट केला होता.
यावेळी एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली होती की, “सेहवाग सरांची कारकीर्द संपविणाऱ्या महेंद्र सिंग धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” यावर सेहवागने उत्तर दिले होते की, “चुकीचे विधान.”
सेहवाग आणि धोनीने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एकत्र खूप वेळ घालवला. २०१५ मध्ये वीरेंद्र सेहवागने तर २०२० मध्ये महेंद्र सिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सेहवागने भारतीय संघासाठी १०४ कसोटी सामने खेळले होते आणि त्यात त्याने ८५८६ धावा केल्या होत्या. याबरोबरच त्याने २५१ एकदिवसीय सामने खेळले होते आणि त्यात ८२७३ धावा केल्या होत्या. टी-२०क्रिकेटमध्ये त्याने १९ सामन्यात ३९४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
काय सांगता! आयपीएलच्या आयोजनासाठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल
‘लेडी सेहवाग’ १०-१५ रुपयांसाठी मारायची चौकार-षटकार, स्वत:चं केला खुलासा