---Advertisement---

DC vs LSG शेवटचा सामना कसा रंगला? थोडक्यात जाणून घ्या

On: सोमवार, मार्च 24, 2025 11:43 AM
---Advertisement---

आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. दोनही संघ आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळणार आहेत. दिल्लीतून लखनऊ मध्ये गेलेला रिषभ पंत आणि लखनऊ मधून दिल्ली मध्ये प्रवेश केलेल्या के एल राहुल, या दोघांच्याही कामगिरीवरती सर्वांचे लक्ष असणार आहेत.

आज विशाखापट्टणम येथे या दोन संघांमध्ये भिडंत होणार आहे. परंतु, या दोन संघात शेवटचा सामना कधी झाला व त्या सामन्यात कोणी बाजी मारली? गेल्या हंगामात या दोन संघांमध्ये सामना खेळण्यात आला होता. त्याच सामन्यात दिल्ली कॅपिटलने लखनऊ सुपर जायंट्सला 19 धावांनी पराभूत केले होते.

पहिल्यांदा फलंदाजी साठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटलने 20 ओव्हर मध्ये 4 विकेट घेत 208 धावांचा टप्पा गाठला. दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेलने सर्वाधिक 33 चेंडूत 58 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत 57 धावा केल्या. शाई होपने 27 चेंडूत 38 धावा केल्या. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन उल हक सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिल्ली कॅपिटल्सकडून नवीन उल हकने 2 फलंदाजांना बाद केले. याशिवाय अर्शद खान आणि रवी बिश्नोई यांना 1-1 यश मिळाले.

दिल्ली कॅपिटल्सच्या 206 धावांच्या प्रत्युत्तरात, लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 9 गडी बाद फक्त 189 धावाच करू शकले. अशाप्रकारे, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सकडून यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने 27 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय, अर्शद खानने 33 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 3 चौकार आणि 5 षटकार मारले. पण क्विंटन डी कॉक, केएल राहुल, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा आणि आयुष बदोनी सारख्या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे, लखनौ सुपर जायंट्स लक्ष्यापेक्षा मागे पडले.

दिल्ली कॅपिटल्सकडून इशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---