ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 3-1 ने गमावल्यानंतर भारतीय संघ आता पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. भारताला 22 जानेवारीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर, भारतीय खेळाडूंना 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी व्हायचे आहे. ज्याचे फायनल 9 मार्चला होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलनुसार खेळणार आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. जाणून घ्या, भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघ कधी जाहीर होऊ शकतो?
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 12 जानेवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करेल. 12 जानेवारी ही तारीख सर्व संघांना 15 सदस्यीय संघ निवडण्याची अंतिम मुदत आहे. तथापि, आयसीसी 13 फेब्रुवारीपर्यंत सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्याची परवानगी देईल. आगामी स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. ज्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेशही या गटात आहेत. तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि इंग्लंड ब गटात आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व संघांना त्यांचे तात्पुरते संघ 12 जानेवारीपर्यंत सादर करावे लागतील, परंतु त्यांना 13 फेब्रुवारीपर्यंत बदल करण्याची परवानगी असेल. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपकर्णधार होण्याची शर्यत जिंकू शकतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला मागे टाकून तो कर्णधार रोहित शर्माचा उपकर्णधार बनू शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 19 फेब्रुवारीला कराची येथे होणार आहे. 20 फेब्रुवारीला भारत स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारताचा पहिला सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. 23 फेब्रुवारीला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. भारताला तिसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा सामना (2 मार्च) करायचा आहे. जर भारताने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठली तर संघाचे सामने दुबईत होतील. जर भारत पात्र ठरू शकला नाही तर लाहोरमध्ये फायनलचे आयोजन होईल.
हेही वाचा-
PAK vs SA: पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा विजयी रथ कायम
टेंबा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचे ‘अच्छे दिन’, पाहा कर्णधाराची रेकाॅर्डब्रेक कामगिरी
‘तेल ही गेलं तुप ही गेलं’, बीजीटीच्या पराभवनंतर टीम इंडियाला दुहेरी फटका, आयसीसी क्रमवारीत मोठी घसरण