---Advertisement---

पहिल्याच भेटीत विराटने सचिनच्या पायाशी घातले होते लोटांगण, ‘मास्टर ब्लास्टर’ही गेला होता गोंधळून

On: सोमवार, मे 17, 2021 2:33 PM
Sachin-Tendulkar-Virat-Kohli
---Advertisement---

क्रिकेटमध्ये मैदानावर जय-पराजयाचा ताणतणाव असला तरीही ड्रेसिंग रूमचे वातावरण नेहमीच आनंददायी व हलकेफुलके असते. जगातील क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ ही बाब नेहमीच लक्षात ठेवतो. म्हणूनच वेळोवेळी ड्रेसिंग रूममधील जुन्या मजेशीर आठवणी कायमच बाहेर येत असतात. अशीच एक गमतीशीर घटना भारताचे माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच एका यूट्यूब वाहिनीशी बोलताना सांगितली आहे.

2008 साली विराट कोहलीची प्रथमच भारतीय संघात निवड झाली. आपल्या निवडीची बातमी ऐकताच विराट दोन दिवस विचार करत होता की त्याचे आवडते खेळाडू सचिन तेंडुलकर यांना कसे भेटायचे. विराटची ही उत्सुकता संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी ओळखली आणि त्यांनी विराट सोबत गम्मत करण्याची योजना आखली.

युवराज सिंग, हरभजन सिंग तसेच इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांनी एक योजना बनवली. या चौघांनी मिळून विराटला सांगितले की, “ड्रेसिंग रूममध्ये सचिन पाजी जेव्हा पण दिसतील तेव्हा तू त्यांच्या पाया पडायचे. प्रथमच संघात सामील झालेला प्रत्येक खेळाडू सचिनकडून असेच आशीर्वाद घेतो. ही आमची परंपरा आहे व ही सर्वांनीच बजावली आहे. आता तुझी पाळी.”

युवा विराटला हा विनोद असू शकतोय याची कल्पना देखील नव्हती. त्याने ते खरे मानले कारण सचिनला भेटण्यासाठी तो देखील आतुर होता.

सचिन यांनी आता हा १३ वर्षे जुना किस्सा सांगताना म्हटले की, “जेव्हा विराट माझ्या पाया पडला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो आणि काय चालले आहे याचा विचार करायला लागलो. मी त्याला विचारले तू काय करत आहेस? व त्याला सांगितले की याची काहीही गरज नाही. ही भारतीय संघाची परंपरा नाही. मग तो उठला आणि तेव्हा मी त्या सर्वांना (युवराज, इरफान, हरभजन, मुनाफ) जोरजोरात हसताना बघितले.”

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी गोलंदाजाने तोडली होती बरगडी, तशाच अवस्थेत चार महिने सचिनने खेळले होते क्रिकेट

‘मला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताकडून खेळायचे आहे,’ २० शतके करणाऱ्या फलंदाजाने व्यक्त केली इच्छा

पाकिस्तान संघातील ‘राजकारणा’स बळी पडत २००९मध्येच निवृत्ती घेणार होता आफ्रिदी, स्वत:च केला उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---