अाज आयसीसीने इंस्टाग्रामवर एक काच फुटलेला फोटो शेअर केला. या फोटोला २ तासात तब्बल ३४ हजार लाईक्स मिळाले तर अनेक क्रिकेटप्रेमींनीही हा फोटो शेअर केला आहे.
आज विश्वचषक २०१९च्या पात्रता फेरीच्या सामन्यात अार्यलॅंड विरुद्ध विंडीजकडून ७व्या क्रमांकावर राॅनमॅन पाॅवेल या खेळाडूने आज १०० चेंडूत १०१ धावा करताना चक्क ७ चौकार आणि ७ षटकारांची बरसात केली. त्याने १०० पैकी तब्बल ७७ धावा चौकार आणि षटकारातुन केल्या.
एकवेळ विंडीजची ५ बाद ८३ अशी अवस्था होती परंतू राॅनमॅन पाॅवेलच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ५० षटकांत ८ बाद २५७ धावा केत्या आहेत.
त्याचे हे वनडेतील पहीलेच शतक आहे. हे शतक करताना त्याने केवीन ओब्रायनला षटकार खेचला. तो तेव्हा ९५ धावांवर खेळत होता. त्याच्या ह्या षटकाराने स्टेडीयममधील एका कक्षाची काच मात्र फोडली.
७व्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतकी खेळी करणारा तो जगातील १६वा तर विंडीजचा पहिलाच खेळाडू ठरला.
1️⃣2️⃣2️⃣ minutes
9️⃣8️⃣ deliveries
7️⃣ boundaries
6️⃣ sixes
1️⃣ broken window!All add up to a maiden ODI 💯 and the biggest innings by a @westindies No. 7 or lower for @Ravipowell26!
Watch the best bits here!
👉 https://t.co/Uy9x8GzecJ pic.twitter.com/LtdTD4txEe— ICC (@ICC) March 10, 2018
Big Bats ! @Ravipowell26 ! Proud cya done me bredda ! pic.twitter.com/0QF5k0AxoH
— Murphy’s Law (@TheDr_Love) March 10, 2018