अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२चा अंतिम सामना झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.१ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर राजस्थानचे लक्ष्य गाठले. हा सामना जिंकत गुजरातनने राजस्थानच्या १४ वर्षांनंतर पुन्हा जेतेपद पटकावण्याच्या स्वप्नांना चुराडा केला आहे. कुठे ना कुठे राजस्थानच्या या पराभवामागे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचाही हात आहे. ते कसे? या बातमीतून पाहूया…
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या साखळी फेरीतील १४ पैकी ९ सामने जिंकत राजस्थान १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. परिणामी गुजरात टायटन्सबरोबर राजस्थानही पहिल्या क्वालिफायर सामन्यात खेळण्यासाठी पात्र ठरला. मात्र या सामन्यात गुजरातने राजस्थानला आस्मान दाखवले आणि ७ विकेट्सने हा सामना जिंकला. परिणामी राजस्थानला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी अजून एका सामन्याचा टप्पा पार करावा लागला.
पहिल्या क्वालिफायर सामन्यातील अपयशानंतर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा संघ बेंगलोर संघाशी भिडला. या सामन्यात तिन्ही विभागात आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवत राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. अशाप्रकारे राजस्थानमुळे बेंगलोरचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला. हाच पराभव राजस्थान संघाच्या आयपीएल ट्रॉफी विजयाच्या आड येऊ शकत होता आणि झालेही तसेच.
यापूर्वी प्लेऑफ्समध्ये ज्या ज्या संघांनी बेंगलोरला पराभूत करत त्यांना स्पर्धेतून बाहेर ढकलले आहे. त्या त्या संघांना अंतिम सामना जिंकत अपयश आले आहे. २०१० मध्ये मुंबई इंडियन्सने बेंगलोरला प्लेऑफ्समध्ये पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला २२ धावांनी पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. असेच २०१५ साली चेन्नई संघासोबतही घडले होते. चेन्नईने प्लेऑफमध्ये बेंगलोरला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला ४१ धावांनी पराभूत करत चषक उंचावला होता.
२०२० साली सनरायझर्स हैदराबाद आणि २०२१ साली कोलकाता नाईट रायडर्स संघांसोबतही असेच घडले होते. आता राजस्थान संघासाठीही ही नकारात्मक बाब ठरली आहे. राजस्थानने गुजरातविरुद्धचा सामना ७ विकेट्सने गमावला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फायनलपूर्वी शेन वॉर्नच्या आठवणीने जोस बटलरला कोसळले रडू, Photo आणि Video होतोय व्हायरल
“मी तुझे पैसे परत करेल”, जेव्हा राजस्थान संघ सोडण्यासाठी शेन वॉर्नने केलेली मनाची तयारी