विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. सध्या कोहलीच्या नावावर 80 शतके आहेत आणि या यादीत फक्त सचिन तेंडुलकर (100 शतके) त्याच्या पुढे आहे. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर 15921 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर कोहलीने 8871 धावा केल्या आहेत आणि इंग्लंडच्या जो रूटने कसोटीत 12402 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम कोणता फलंदाज मोडू शकेल याची चर्चा सुरू आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहलीने 2020 पासून कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 2 शतकी खेळी खेळली आहे. ज्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या सरासरीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम पाहता कोहलीबद्दल ब्रॅड हॉग म्हणाला, “विराट कोहली ही कामगिरी करू शकेल, असे मला वाटत नाही. माझ्या मते, विराट कोहलीने गेल्या काही वर्षांपासून लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली लय गमावली आहे. अशा परिस्थितीत त्याने लवकरच आगामी 10 कसोटी सामन्यांमध्ये आपली लय परत मिळवावी. आणि चांगले काम करून दाखवावे लागेल.”
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 114 सामन्यांच्या 193 डावांमध्ये 48.74 च्या सरासरीने 8871 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 29 शतकांचा समावेश आहे. पण त्याच्या अलीकडच्या कामगिरीच्या आधारे हॉगने आपले मत व्यक्त केले आहे.
तसेच उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या रूटबद्दल हॉग म्हणाला, “जो रूट सध्या सचिनचा विक्रम मोडण्याच्या सर्वात जवळ आहे. त्याने 146 कसोटी सामन्यांमध्ये 12000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि सचिनने 200 सामने खेळताना आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक 15921 धावा केल्या आहेत. आकडेवारीच्या आधारे जो रूट त्याच्या जवळपास आहे. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी 4000 धावा आवश्यक आहेत. जे तो आगामी काळात सहज साध्य करू शकतो.
हेही वाचा-
रणजी ट्रॉफी 2024-25; विराट कोहलीचे 5 वर्षात प्रथमच दिल्लीच्या संभाव्य संघात नाव!
AUS vs ENG: 304 धावा करूनही कांगारू हरले, पाहा ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी ‘इंग्लंड’ची मोठी खेळी; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची निवृत्ती मागे





