---Advertisement---

जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल

On: शनिवार, सप्टेंबर 19, 2020 8:42 AM
---Advertisement---

आजपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या आयपीएल हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अबुधाबी मध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.

मुंबई इंडियन्स गतविजेता तर चेन्नई सुपर किंग्ज गेल्यावर्षीचा उपविजेता संघ आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर होत आहे.

विशेष म्हणजे चेन्नई सहाव्यांदा आयपीएल हंगामातील सलामीचा सामना खेळणार आहे. याआधी चेन्नईने २००९, २०११, २०१२, २०१८ आणि २०१९ या हंगामात पहिला सामना खेळला होता.

यापैकी २०११ आणि २०१८ च्या हंगामात चेन्नईने विजेतेपद मिळविले. तर २०१२ आणि २०१९ च्या हंगामात चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच २००९ हा असा एकच हंगाम होता ज्यावेळी चेन्नई पहिला सामना खेळल्यानंतर अंतिम सामन्यात पोहोचला नव्हता. त्यांना त्या हंगामात उपांत्य फेरी पर्यंतच मजल मारता आली होती.

आता चेन्नई पुन्हा एकदा पहिला सामना या हंगामात खेळणार आहे. त्यामुळे यावेळीही चेन्नईला अंतिम सामन्यात पोहोचण्यात यश येते का हे पाहावे लागेल.

जेव्हाही चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळतात तेव्हा लागलेला निकाल – 

२००९ – उपांत्य सामना

२०११ – विजेते

२०१२ – उपविजेते

२०१८ – विजेते

२०१९ – उपविजेते

२०२० – ??

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---