सध्या वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (Icc under19 world cup) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ४५ धावांनी पराभूत केले होते. यासह स्पर्धेला जोरदार प्रारंभ केला होता. ४ वेळेस विश्वविजेत्या भारतीय (Indian under 19 team) संघाचा पुढील सामना आयर्लंड (Ireland under 19 team) संघाविरुद्ध होणार आहे. पुढे जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. चला तर पाहूया केव्हा, कुठे आणि कधी रंगणार हा सामना.
१. केव्हा रंगणार भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना?
भारतीय संघाचा दुसरा सामना बुधवारी (१९ जानेवारी ) आयर्लंड संघाविरुद्ध पार पडणार आहे.
२. कुठे पार पडणार भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना?
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
३. किती वाजता सुरू होईल भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना?
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्याचे नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता होईल. तर ६:३० वाजता पहिला चेंडु टाकला जाईल.
४. कुठे पाहु शकणार भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना?
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
५. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना ऑनलाईन कुठे पाहू शकता?
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एस. रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर.एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.
राखीव: ऋषी रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्याय
महत्वाच्या बातम्या :
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर की ऋतुराज गायकवाड? कोणाला मिळणार पहिल्या वनडेसाठी टीम इंडियात संधी
हे नक्की पाहा: