---Advertisement---

कधी, कुठे आणि कसा पाहता येईल भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना? येथे घ्या जाणून

On: सोमवार, नोव्हेंबर 21, 2022 11:51 PM
Kane-Williamson-And-Hardik-Pandya
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने रोडा घातला होता. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकही झाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 65 धावांनी विजय मिळवला होता. यासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल.

क्रिकेट चाहते दुसऱ्या टी20 सामन्यात या गोष्टीने चिंतेत होते की, सामना टीव्हीवर कसा पाहिला पाहिजे. अशात मालिकेतील तिसऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी टीम साऊदी (Tim Southee) न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच, मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाची संपूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर असेल. या सामन्यात भारतीय संघ काही बदल करू शकते. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर कुलदीप यादवही खेळू शकतो.

कधी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे.

कुठे खेळला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना नेपियरच्या मॅकलीन पार्क स्टेडिअमवर खेळला जाईल.

कधी सुरू होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक सकाळी 11.30 वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर प्रसारित होणार आहे.

फोन किंवा लॅपटॉपवर कसा पाहता येणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ ऍपवर होणार आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ

भारत
शुबमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि हर्षल पटेल.

न्यूझीलंड
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साउथी (कर्णधार), ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी. (where to watch india vs new zealand 3rd t20i match online know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी गुन्हेगार नाहीये…’, चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य
क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---