---Advertisement---

आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी चेन्नई ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, धोनीचं काय होणार?

CSK
---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत होता. सीएसके जवळपास संपूर्ण हंगामात टॉप-4 मध्ये राहिली. परंतु जेव्हा प्लेऑफमध्ये जाण्यासाठी विजय आवश्यक होता, तेव्हा चेन्नईचा आरसीबीकडून 27 धावांनी पराभव झाला. गतविजेता संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला.

आता चेन्नईचं आयपीएल 2024 मधील आव्हान संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. तो पुढचा हंगाम खेळणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे. जर धोनी निवृत्त झाला, तर चेन्नई आयपीएल 2025 साठी कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकते, हे या बातमीद्वारे जाणून घ्या.

ऋतुराज गायकवाड – आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती. त्याच्या नेतृत्वात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसला, तरी सीएसकेची या हंगामातील कामगिरी सरासरीपेक्षा चांगली राहिली. अशा परिस्थितीत संघ ऋतुराजला भविष्यात कर्णधारपदी कायम ठेवेल यात शंका नाही. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिला जात असलेल्या ऋतुराजनं या हंगामात 14 सामन्यांमध्ये 583 धावा केल्या. सध्या त्याला एका हंगामासाठी 6 कोटी रुपये मिळतात.

रवींद्र जडेजा – रवींद्र जडेजाचं चेन्नई सुपर किंग्जसोबत खास नातं आहे. तो गेल्या 12 वर्षांपासून संघाचा भाग आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला असला तरी, गेल्या वर्षी अंतिम सामन्यात त्यानंच शानदारी खेळी खेळून सीएसकेला ट्रॉफी जिंकवून दिली होती. या हंगामात जडेजानं फलंदाजीत 267 धावा आणि गोलंदाजीत 8 बळी घेतले. रवींद्र जडेजाला आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी 16 कोटी रुपये मिळाले होते.

शिवम दुबे – चेन्नईमध्ये दाखल झाल्यापासून शिवम दुबेच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यानं सीएसकेकडून खेळताना 41 सामन्यात 1,103 धावा केल्या आहेत. या हंगामाच फिनिशर आणि पॉवर हिटरची भूमिका बजावत, त्यानं 14 सामन्यांमध्ये 396 धावा ठोकल्या. वास्तविक, दुबेची फलंदाजीची शैली चेन्नईच्या टीमला भावते. जर त्यानं संघाची साथ सोडली, तर सीएसकेच्या मधल्या फळीचं मोठं नुकसान होईल. दुबे सध्या एक हंगाम खेळण्यासाठी 4 कोटी रुपये घेतो.

माथिशा पाथिराना – श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानासाठी चेन्नई सुपर किंग्ज एका कुटुंबाप्रमाणे आहे. तो महेंद्रसिंह धोनीला आपल्या वडिलांप्रमाणे मानतो. यावरूनच पाथीरानाच्या हृदयात चेन्नईचं काय स्थान आहे, हे कळतं. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जची मॅनेजमेंट देखील त्याला सोडणार नाही, कारण गेल्या 2 हंगामात त्यानं संघासाठी 18 सामन्यांत 32 बळी घेतले आहेत. नवीन चेंडू तसेच डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात पाथिरानाला नैपुण्य आहे. पाथिराना सध्या एक सीझन खेळण्यासाठी 20 लाख रुपये घेतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळल्या गेलेल्या 3 तुफानी खेळी, ज्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहेत

“हार्दिक पांड्याचा कोणताही दोष नाही, मुंबई इंडियन्सच्या या अवस्थेला…”, हरभजन सिंगची रोहित शर्मावर नाव न घेता टीका

काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---