सध्या आयपीएल 2025 ची तयारी जोरात सुरू आहे. आगामी हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मात्र, अनेक संघमालक मेगा लिलावाच्या बाजूनं नाहीत. यात कोलकाता नाईट रायडर्सचाही समावेश आहे. खेळाडूंना तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो, असं फ्रँचायजीचं मत आहे.
आगामी हंगामापूर्वी लिलाव झाल्यास सर्व संघांना जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची सुविधा मिळावी, असं केकेआरचं म्हणणं आहे. मात्र या मुद्द्यावर बीसीसीआयकडून अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर आलेलं नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमधून केकेआर आगामी हंगामापूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल, याची हिंट मिळत आहे.
केकेआरच्या संघानं त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, कॅरेबियन अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनील नारायण, भारतीय संघाचा युवा स्टार रिंकू सिंह आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांचं जीमेल अकाउंट दिसत आहे. गेल्या आयपीएल हंगामात या पाच खेळाडूंनी केकेआरला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच केकेआरच्या या पोस्टनंतर आगामी हंगामापूर्वी संघ या पाच खेळाडूंना रिटेन करणार, अशी शक्यता चाहते व्यक्त करत आहेत.
Yes. https://t.co/faDFf6n21A pic.twitter.com/tFnTG91Ork
— KolkataKnightRiders (@KKRiders) August 14, 2024
आता मुख्य प्रश्न असा की, बीसीसीआय सर्व संघांना लिलावापूर्वी केवळ 4 खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा देते. मग केकेआरचा संघ 5 खेळाडूंना रिटेन कसं करणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2025 साठी बीसीसीसीआय संघांना 6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. त्यानंतर, आपल्या योजनेचा भाग म्हणून केकेआरनं या 5 खेळाडूंची नावं शेअर केली आहेत. आता केकेआर मेगा लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
स्टीव्ह स्मिथचा आयपीएलमध्ये कमबॅक! मेगा लिलावासाठी नाव देणार
भारताच्या माजी क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
17 वर्षांचा सचिन सर्वांना पुरून उरला! आजच्याच दिवशी ठोकलं होतं कारकिर्दीतील पहिलं शतक