रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली. आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. संघाला सुरुवातीला सलग 6 परभवांचा सामना करावा लागला होता. परंतु हंगामाच्या शेवटच्या टप्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं जोरदार पुनरागमन केले. आयपीएल 2024 अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, पुढील वर्षी मेगा लिलावापूर्वी आरसीबी संघ कोणत्या खेळाडूंना ताफ्यात कायम ठेवेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
यंदाच्या हंगामात आरसीबीला विदेशी खेळाडूंनी खूप निराश केलं आहे. अल्जारी जोसेफ, लाॅकी फर्ग्यूसन, ग्लेन मॅक्सवेल यांना आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करता आली नाही. तत्पूर्वी मेगा लिलावात आरसीबी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार, हे पाहणंदेखील महत्वाचं राहणार आहे.
RCBया खेळाडूंना (IPL 2025) साठी कायम ठेवू शकते
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहलीला कायम ठेवेल अशी दाट शक्यता आहे. कारण कोहलीची फलंदाजी हे आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचे मुख्य कारण आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या मोसमात आतापर्यंत 15 सामन्यांमध्ये त्यानं 154.70 च्या स्ट्राइक रेटनं 741 धावा ठोकल्या आहेत.
दुसरे नाव जे फ्रेंचायझी चुकवू इच्छित नाही ते म्हणजे विल जॅक. या मोसमात आतापर्यंत आठ सामने खेळून त्यानं 175.57 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं 230 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकासह, एका शतकाचादेखील समावेश आहे. जॅकचे नाव आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी आरसीबी संघाकडून राखले जाण्याची शक्यता आहे.
मोहम्मद सिराज 2018 पासून बंगळुरु फ्रँचायझीशी संबंधित आहे. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्यानं या हंगामात आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. सिराजला कायम ठेवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपली गोलंदाजी मजबूत करायला आवडेल.
रजत पाटीदारने विस्फोटक फलंदाजी केली आहे. भागीदारी रचण्याची आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पाटीदारने 15 सामन्यात 177 च्या स्ट्राईक रेटने 395 धावा ठोकल्या आहेत. आरसीबी संघासाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या मुख्य प्रशिक्षकांची प्रतिक्रिया म्हणाले, “या सामन्यात जे काही…”
अंबाती रायडूचं आरसीबीवर वादग्रस्त विधान म्हणाला, “आक्रमक सेलिब्रेशन करून ट्राॅफी…”
पाकिस्तान कधी करणार टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा?