सध्या बूची बाबू स्पर्धा सुरु आहे. त्यामध्ये भारतीय टी20 संघाचा कर्णधार आणि मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आपल्या संघाकडून खेळत आहे. श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स क्रिकेट ग्राउंड, कोईम्बतूर येथे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन विरुद्धच्या सामन्यादरम्यान सूर्यकुमारनं गोलंदाजी केली. श्रीलंका दौऱ्यावर देखील टी20 मालिकेदरम्यान त्यानं गोलंदाजी केली होती. त्याआधी सूर्यानं कधीही आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी केली नव्हती.
सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना सूर्यकुमार यादवनं बीमर फेकला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या डावात ही घटना घडली. सूर्यकुमारनं आपल्या षटकातील तिसरा चेंडू त्याच्या हातातून नीट सोडला नाही आणि तो फलंदाजाच्या छातीजवळ गेला. चेंडूला वेग नसल्यामुळे फलंदाज आतिशनं तो खेचला आणि चौकार लगावला. दरम्यान सूर्यकुमारला आपली चूक लगेच समजली आणि त्यानं हात वर करून फलंदाजाची माफी मागितली.
या सामन्यात तामिळनाडूनं मुंबईचा दारुण पराभव केला. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हननं चमकदार कामगिरी केली. त्यांनी पहिल्या डावात 379 धावा केल्या, तर मुंबईचा संघ 156 धावांवरच सर्वबाद झाला. तामिळनाडूनं पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांची आघाडी घेतली. यानंतर तामिळनाडूचा संघ दुसऱ्या डावात 286 धावांत सर्वबाद झाला. मुंबईला विजयासाठी 510 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईचा दुसरा डाव 223 धावांवर आटोपला. त्यामुळे तामिळनाडूच्या संघाचा शानदार विजय झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
“जो रुटला दोन जन्म घ्यावे लागतील, विराटचा…”, चाहत्यांनी घेतला मायकल वॉनचा क्लास
RCB साठी आनंदाची बातमी! संघातील ‘या’ स्टार खेळाडूने ठोकले झंझावाती शतक
10 लाखापासून सुरुवात, आता कोट्यावधी रुपयांचा मालक; पाहा याॅर्कर किंगची नेटवर्थ