भारतीय संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर असून यामध्ये एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहे. यातील कसोटी सामना १ ते ५ जुलैला एजबस्टन क्रिकेट ग्राऊंड, बर्मिंघम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सामना २३ ते २६ जून दरम्यान लीसेस्टर येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने सरावाला सुरूवात केली आहे. त्यात आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामात काही खेळांडूची निराशाजनक कामगिरी झाली होती. ते नेटमध्ये कसून सराव करताना दिसले आहेत.
अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा या कसोटीसाठी संघात समावेश असून तो नेटमध्ये गोलंदाजीचा अभ्यास करताना दिसला आहे. आयपीएलमध्ये त्याला दुखापत झाली होती म्हणून तो काही सामने बाहेर होता. आयपीएलमधील लयीचा विचार न करता तो नव्याने सरावाला लागला आहे.
Ravindra Jadeja bowling practice at Leicester,he seems to be fully fit after a rib injury in ipl 2022#INDvsENG #INDvENG#ENGvIND @imjadeja pic.twitter.com/tPVNO8BXhn
— Cricket Mirror (@Cricket_Mirror_) June 21, 2022
काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘वेगळ्या जर्सीसोबत नवीन सुरूवात’, असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता. या कॅप्शनवरून तो चेन्नई सुपर किंग्ज सोडणार का असा चर्चांना उधान आले होते. तसे काही नसून तो आता आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात व्यस्त असणार आहे.
Looking to start fresh in the different jersey???? pic.twitter.com/EhKX1svf1H
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) June 18, 2022
जडेजाला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. बाहेरील मैदानावर संघाने त्याच्यावर अधिक विश्वास दाखवला आहे. या कसोटीसाठी त्याची अकरा जणांच्या संंघात जागा निश्चित झाली तर तो एकटा फिरकीपटू असणार आहे. मागील वर्षीच्या चारही कसोटी सामन्यात आर अश्विन बाकावरच बसून होता. जडेजाची कसोटीमधील लय उत्तम ठरली तर त्याला वनडे संघाताही जागा मिळू शकते.
भारतीय संघासाठी या कसोटी सामन्यात जिंकणे किंवा सामना अनिर्णीत ठेवणे महत्वाचे आहे. मागील वर्षाच्या पाच कसोटी सामन्यांंच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे भारतीय संघाला मायदेशी परतावे लागले होते. त्यावेळी झालेल्या चार कसोटी सामन्यांपैकी भारताने २ आणि इंग्लंडने १ सामना जिंकला आहे. एक सामना अनिर्णीत राहिला होता.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा अकरा जणांचा संघ खालील खेळाडूंमधून निवडला जाईल,
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! टी२० क्रमवारीत दिनेश कार्तिकची चक्क १०८ स्थानांनी भरारी, इशानचाही टॉप-१०मध्ये ताबा
काय सांगता! सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणार बुमराहसह ‘हे’ ४ क्रिकेटर, पाहा कसे आहेत संघ
‘कोहलीचा खराब फॉर्म रवि शास्त्रींमुळेच!’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा विचित्र दावा






