चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आयपीएल 2023च्या 24व्या सामन्यात युवा खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानावर आणले. तो खेळाडू इतर कुणी नसून आकाश सिंग आहे. या वेगवान गोलंदाजाने त्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई संघासाठी मोठी कामगिरी केली. त्याने विराटला त्रिफळाचीत बाद केले. त्यामुळे आता हा खेळाडू नेमका आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चला तर त्याच्याविषयी जाणून घेऊया…
ही घटना बेंगलोरच्या डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर घडली. विराट कोहली (Virat Kohli) याने पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेत त्याच्या बुटाला लागला. त्यानंतर चेंडू त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायाला लागत स्टंपला जाऊन लागला. कदाचित आतापर्यंत कोणताही खेळाडू अशाप्रकारे बाद झाला नसेल.
How about that for a start for @ChennaiIPL with the ball 🔥🔥
IMPACT PLAYER Akash Singh gets Virat Kohli in the first over 💪
Follow the match ▶️ https://t.co/nvoo5Sl96y #TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/m8aiiPzfVU
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
कोण आहे आकाश सिंग? (Who Is Akash Singh?)
आकाश सिंग (Akash Singh) याच्याबाबत बोलायचं झालं, तर तो आयपीएल (IPL) स्पर्धेमध्ये नवीन आहे. तो काही वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. तो चेन्नईविरुद्ध अबू धाबीत झालेल्या सामन्यात खेळला होता. त्यावेळी त्याने चार षटकात एकही विकेट न घेता 39 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याला संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2022च्या मेगा लिवावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यानंतर चेन्नई संघाने राजस्थानच्या भरतपूर येथे राहणाऱ्या वेगवान गोलंदाजाला दुखापतग्रस्त मुकेश चौधरी याचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील केले. आकाश सन 2020मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता.
https://twitter.com/yyaga18/status/1647998689401778176
यानंतर आकाशसाठी कठीण काळ तिथेच संपला नाही. त्याला राजस्थानच्या राज्यस्तरीय संघातही स्थान मिळवता आले नाही. आकाश यानंतर नागालँडला गेला. 2022-23मध्ये तो पाहुणा खेळाडू म्हणून खेळला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तो सहा सामन्यात फक्त 5 विकेट्स घेऊ शकला होता. तसेच, रणजी ट्रॉफीत 10 आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 14 विकेट्स घेऊ शकला.
आकाश हा वेगवान गोलंदाज आहे. तो अनेकदा ताशी 145 किमी गतीने गोलंदाजी करू शकतो. त्याला चेन्नईने दोन वर्षांच्या करारासह संघात सामील केले आहे. तसेच, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळून त्याला क्रिकेटचे धडे घेता येऊ शकतात. (who is akash singh chennai Super kings left arm pacer who got virat kohli ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणे जोमात, फाफ कोमात! 91 मीटरचा गगनचुंबी षटकार मारताच आरसीबीच्या कॅप्टनचे पडले तोंड, पाहा व्हिडिओ
कॉनवे-दुबेच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नईने पार केला 200चा आकडा, बेंगलोरपुढे भलेमोठे आव्हान