रविवारी (१७ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील पहिला सामना ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ओमान संघाने अप्रतिम कामगिरी करत १० गडी राखून विजय मिळवला. दरम्यान ओमान संघातील गोलंदाज बिलाल खान टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. पण कोण आहे बिलाल खान? चला जाणून घेऊया.
एका मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज
ओमान संघाचा वेगवान गोलंदाज बिलाल खानच्या नावे एकाच मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आहे. या यादीत तो जेशान मकसुदसह सर्वोच्च स्थानी आहे. बिलाल खानने आयसीसी पुरुष विश्वचषक लीग २ च्या १७ सामन्यात एकूण २९ गडी बाद केले होते. हा एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी ग्लेन मॅकग्राने १९९८/९९ मध्ये झालेल्या काल्टन अँड युनायटेड मालिकेतील ११ सामन्यात २७ गडी बाद केले होते. ही मालिका ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका या ३ संघांमध्ये झाली होती.
बिलाल खानच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर ओमानने गाठली पात्रता फेरी
बिलाल खानने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ओमान संघाने आयसीसी २०२१ टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत प्रवेश करण्यापूर्वी हाँगकाँग संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ओमान संघाला अवघे १३४ धावा करण्यात यश आले होते. अशा स्थितीत बिलाल खानने जबाबदारी स्वीकारली आणि अप्रतिम गोलंदाजी करून ओमान संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने या सामन्यात ४ गडी बाद केले होते.
अशी आहे बिलाल खानची कारकीर्द
बिलाल खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, १८ वनडे सामन्यात एकूण २९ गडी बाद केले आहेत. तर टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण ३६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ५३ गडी बाद करण्यात यश आले आहे.
The first wicket of the ICC Men's #T20WorldCup 2021 belonged to Bilal Khan 🔥https://t.co/nA12nCeZkj
— T20 World Cup (@T20WorldCup) October 17, 2021
ओमानचा १० गडी राखून जोरदार विजय
या सामन्यात ओमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघाकडून कर्णधार असद वालाने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर चार्ल्स अमिनीने ३७ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पापुआ न्यू गिनी संघाला २० षटक अखेर ९ बाद १२९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ओमान संघाकडून जतींदर सिंगने नाबाद ७३ आणि आकिब इलियासने नाबाद ५० धावांची खेळी केली. हा सामना ओमान संघाने १० गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
शाकिबचा टी२० विश्वचषकात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मलिंगाला ओव्हरटेक करत बनला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत