इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. मात्र हा लिलाव सुरु असतानाच एक धक्कादायक गोष्ट घडली. ती म्हणजे लिलाव सांभाळणारे म्हणजेच ऑक्शनर ‘ह्यूज एडमिड्स’ हे लिलाव सुरु असतानाच अचानक चक्कर आल्याने खाली कोसळले. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापासून चारू शर्मा यांनी तात्काळ ऑक्शनरची जबाबदारी सांभाळली.
ह्युज एडमिड्स हे जेव्हा जमीनीवर कोसळले त्यावेळी वनिंदू हसरंगाची बोली सुरु होती. मात्र, ही त्याचा लिलाव सुरू असतानाच कोणालाही काही कळायच्या आत अचानक ते कोसळले. त्यामुळे तातडीने त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आल्या, तसेच लिलावाचे दुसरे सत्रही थांबवण्यात आले होते. पण नंतर त्यांची तब्येत बरी असल्याचे समजले आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याचे समजले आहे. पण, जोखीम नको म्हणून चारू शर्मा यांनी आयपीएल लिलाव पुढे सांभाळला.
कोण आहेत चारू शर्मा?
चारू शर्मा हे प्रसिद्ध समालोचक, निवेदक असून त्यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार सोहळ्यांचे निवेदन केले आहे. तसेच ते २००८ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे सीइओ देखील होते. पण, संघाच्या खराब कामगिरीनंतर ते या पदावरून पायउतार झाले होते. त्यावेळी बेंगलोर संघाकडून सांगण्यात आले होते की, चारू शर्मा यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, चारू शर्मा यांनी आरोप केला होता की, त्यांना बेंगलोरने काढून टाकले होते.
दरम्यान, सध्या चारू शर्मा हे प्रसिद्ध प्रो कबड्डी लीगचे संचालक आहेत. प्रो कबड्डीचा सध्या ८ वा हंगाम सुरू आहे.
आयपीएल लिलावात धक्कादायक निर्णय
या आयपीएल लिलावात अनेक स्टार खेळाडू करोडो रुपयांच्या बोलीसह विकले गेले आहेत, तर सुरेश रैना, शाकिब अल हसन, स्टीव्ह स्मिथ, मोहम्मद नबी सारखे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. तसेच पहिल्या दोन सत्रांमध्ये श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. तसेच वनिंदू हसरंगा देखील महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर १०.७५ कोटी रुपये मोजले.
महत्त्वाच्या बातम्या –
आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरलाय ‘वनिंदू हसरंगा’, घेतली भलीमोठी रक्कम
‘ह्युज एडमिड्स’ कोसळल्यावर ‘या’ व्यक्तीने लढवला आयपीएल लिलावाचा किल्ला, जाणून घ्या नव्या ऑक्शनरबद्दल