न्यूझीलंडने बुधवारी (१० नोव्हेंबर) २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ६ चेंडू आणि राखून ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या इंग्लंडने २० षटकांत ४ गडी गमावून १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १९ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक सलामीवीर डॅरिल मिशेल ठरला.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या विजयाचा नायक सलामीवीर डॅरिल मिशेल ठरला. मिशेलने अवघ्या ४७ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मिशेलने डेव्हॉन कॉनवे (४६) सोबत ८२ धावांची आणि जेम्स नीशम (२७) सोबत ४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या सामन्यात मिशेलने विजयी चौकार देखील लगावला. या जबरदस्त खेळीनंतर या फलंदाजाबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
डॅरिल मिशेल यांचा जन्म २० मे १९९१ रोजी हॅमिल्टन येथे झाला. ३० वर्षीय मिशेल न्यूझीलंडसाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. मिशेल हा मधल्या फळीतील फलंदाज असला, तरी तो या स्पर्धेत सलामीवीर म्हणून संघासाठी भूमिका बजावत आहे.
डॅरिल मिशेलला टी२० विश्वचषक २०२१ च्या सराव सामन्यात सलामीसाठी पाठवले गेले होते, त्यानंतर त्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. संपूर्ण टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये, डॅरिल मिशेलने मार्टिन गप्टिलला सलामीला येऊन साथ दिली. मिशेलने दमदार खेळी करत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. उपांत्य फेरीत मिशेलने चांगली कामगिरी केली. त्याने ४ चौकार आणि चार षटकार मारले.
न्यूझीलंडला १२ चेंडूत २० धावांची गरज असताना मिशेलने वोक्सच्या चेंडूवर दोन दमदार षटकार ठोकून सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला.
डॅरिल मिशेलकडे एकूण ५ कसोटी, ३ एकदिवसीय आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. मिशेलने पाच कसोटी डावांमध्ये ५८ च्या सरासरीने २३२ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांच्या दोन डावात त्याने शतकाच्या मदतीने ११२ धावा केल्या.
याशिवाय २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १९ डावांमध्ये त्याने अर्धशतकाच्या मदतीने ३४५ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत एक विकेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. न्यूझीलंड संघाने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होत. त्यानंतर २०२१ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवले आणि आता टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात असं काय झालं की, समालोचकाला आठवला एमएस धोनी
जेव्हा जिगरी दोस्त अवेश खानने व्यंंकटेश अय्यरला दिली टीम इंडियात निवड झाल्याची बातमी, वाचा किस्सा






