भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स या दोन खेळाडूंमध्ये क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक चांगली मैत्री आहे.
विराट (Virat Kohli) आणि डिविलियर्स (AB De Villiers) हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघाकडून खेळतात. हे दोघेही एकमेकांची प्रशंसा करायला विसरत नाहीत. अशामध्ये आता चाहत्यांना प्रश्न पडलाय की, या दोघांमध्ये सर्वात चांगला खेळाडू (Beat Player) कोण आहे?
यावर ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉगने (Brad Hogg) प्रत्युत्तर दिले आहे. हॉग म्हणाले की, “कोहली.” हॉगला ट्विटरवर एका चाहत्याने प्रश्न विचारला होता की विराटही त्याच्या सर्वोत्कृष्ट टप्प्यावर आहे, तर डिव्हिलियर्सही निवृत्त होण्यास सज्ज आहे. तर या दोघांपैकी सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहे? यावर हॉगने प्रत्युत्तर दिले की, विराटची आकडेवारी त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज बनवते.

याव्यतिरिक्त पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) यांनीही आपले मत व्यक्त केले होते की, विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तसेच तो मियाँदाद यांचा आवडता क्रिकेटपटू आहे.
“मला विचारण्यात आले होते की, भारतीय संघातील सर्वात आवडता क्रिकेटपटू कोण आहे? यावेळी मी विराटला निवडले. मला याबाबतीत जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. कारण विराटची कामगिरी याबाबतीत खूप काही सांगते. लोकांना हे मान्य करावे लागेल आणि तसंही त्याची आकडेवारी सर्वजण पाहु शकतात,” असेही मियाँदाद यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटपटूंनो घरी आहाता ना! मग हे काम करा






