आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीत सोमवारी (दि. 26 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. क्वालिफायर फेरीतील 18वा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड संघात पार पडला. या सामन्यात नेदरलँडने मोठा उलटफेर करत वेस्ट इंडिजला पराभवाचं पाणी पाजलं. वेस्ट इंडिज संघ 374 धावांचा बचाव करू शकला नाही आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर उभय संघात सुपर ओव्हर झाली. या सुपर ओव्हर मध्ये नेदरलँड संघाने विजय संपादन केला. यात नेदरलँड्स संघासाठी अष्टपैलू लोगन वॅन बीक नायक ठरला. मात्र हा बीक नक्की आहे तरी कोण? हे आपण जाणून घेऊया.
या सामन्यात नेदरलँड्स संघाला विजयासाठी 375 धावांची आवश्यकता होती. संघाच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत सामना बरोबरीत सोडवला. 14 चेंडूंवर 28 धावा करणाऱ्या बीक याला सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड संघाने फलंदाजी करण्यासाठी पाठवले. समोर वेस्टइंडीज चा सर्वात अनुभवी गोलंदाज जेसन होल्डर असताना त्याने अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे फटकेबाजी करत तीन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील त्यानेच हे निर्णय षटक टाकले. त्यात आठ धावा देत त्याने दोन्ही फलंदाजांना बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
बीक हा क्रिकेट माहित असणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेला खेळाडू आहे. त्याचे आजोबा सॅमी गुलियन हे न्यूझीलंड व वेस्ट इंडिज संघासाठी खेळले होते. स्वतः बीक न्यूझीलंडसाठी 2010 अंडर 19 व लिस्ट ए क्रिकेट खेळला आहे. मागील वर्षी त्याने नेदरलँड्ससाठी पदार्पण केले. विशेष म्हणजे त्याच्या नावे नेदरलँड्ससाठी हॅट्रिक देखील जमा आहे. त्याचा हा खेळ पाहून भारतीय चाहते तू लवकरच आयपीएलमध्ये दिसणार असे ट्विट करत आहेत.
(Who Is Logan Van Beek Who Thrash Jason Holder In Super Over In World Cup Qualifier)
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरला पछाडत रत्नागिरी जेट्सची MPL फायनलमध्ये एन्ट्री! विजय पावले ठरला विजयाचा शिल्पकार
इतिहासाच्या पानावर नोंद झाले झिम्बाब्वेचे नाव! तब्बल 304 धावांनी मिळवला ऐतिहासिक विजय