इंडियन प्रीमियर लीग २०२२ची (आयपीएल २०२२) रणधुमाळी संपली आहे. नवख्या गुजरात टायटन्स संघाने संपूर्ण हंगामात धडाकेबाज प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन मात्र अतिशय निराशाजनक राहिले आहे. हंगामातील १४ पैकी केवळ ४ सामने जिंकत हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिला. याच मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी आणि मालकीन नीता अंबानी (Nita Ambani) हे आता चर्चेत आले आहेत. त्यांच्या चर्चेत येण्यामागचे कारण त्यांची होणारी सून राधिका मर्चेंट ही आहे.
अंबांनीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याची होणारी पत्नी (Anant Ambani Wife) आणि अंबानी कुटुंबाची होणारी सून (Ambani Family Daughter In Law) राधिका (Radhika Merchant) हिच्या अरंगेत्रम समारंभातील नृत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तिच्या नृत्य प्रदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचमुळे राधिकाही चर्चेचा विषय ठरली आहे.
https://twitter.com/SrikantSinha_/status/1533512243597709312?s=20&t=hcZlGCAg60A30FAwaLKUTQ
राधिका लवकरच अंबानी कुटुंबाची सून बनणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका यांचा साखरपुडा झाला आहे. याव्यतिरिक्तही राधिकाच्या परिवाराचे अंबानी परिवाराशी जवळचे संबंध आहेत. वर्ष २०१८ मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या संगीत कार्यक्रमात राधिकाने श्लोका अंबानीसोबत नृत्य प्रदर्शन केले होते. श्लोका ही मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी आहे.
तसेच राधिकाच्या अरंगेत्रम समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेचा जो फोटो व्हायरल होत आहे, त्यामध्ये अनंत आणि अंबानी कुटुंबियांच्या इतर सदस्यांची नावेही लिहिलेली आहेत. अर्थात अंबानी कुटुंबियांचा हा समारंभ आयोजित करण्यात मुख्य भूमिका असल्याचे दिसते.
https://www.instagram.com/p/CeeMv-DsePN/?utm_source=ig_web_copy_link
कोण आहे राधिका मर्चेंट?
राधिका ही एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. ती भरतनाट्यम करते. तिने मुंबईतील गुरू भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकले आहे. याचाच ५ जून रोजी अरंगेत्रम समारंभ झाला आहे. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर जेव्हा कोणती नृत्यांगना किंवा संगीतकार पहिल्यांदा मंचावर रंगीत तालिम करतात, त्याला अरंगेत्रम असे म्हणतात. या अरंगेत्रम समाभरांतील नृत्य प्रदर्शनातील तिच्या नृत्याने अनेकांना प्रभावित केले आहे.
तसेच राधिका हेल्थ केयरच्या सीईओ वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची मुलगी आहे. मुंबईत वेगवेगळ्या शाळेंमध्ये शिक्षण घेतल्यानंतर राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. तिथे तिने राजकारण आणि अर्थशास्त्रात ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. ग्रॅज्यूएशननंतर राधिका भारतात परतली आणि तिने एका रियल एस्टेट कंपनीत सेल्स प्रोफेशनल म्हणून कामाला लागली. यानंतर आता अंबानी कुटुंबाचा भाग बनल्यानंतर ती आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सची सूत्रे हाती घेऊ शकते. त्यामुळे तिच्याकडे मुंबई संघाची भावी संघ मालकीण पाहणे, चुकीचे ठरणार नाही.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मलिंगा-बुमराहलाही मागे टाकेल अशी गोलंदाजी ऍक्शन! बॉलरचा व्हिडिओ पाहून मायकल वॉनही चकित
अमित शहांनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री पाहायला येणार मॅच, INdvsSA मधील दुसऱ्या टी२०ला लावणार हजेरी
वाईट झालं! खराब फॉर्मातून जात असलेल्या पृथ्वी शॉचं तुटलं हृदय, गर्लफ्रेंड प्राचीसोबत झालंय ब्रेकअप?