ज्यावेळी आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा ती सुरू करणाऱ्या ललित मोदींनाच ही संकल्पना कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका होती. कारण त्यांनी जो घाट घातला होता, त्यासाठी सर्वात जास्त गरज होती पैशाची आणि शेकडो कोटींची इन्व्हेस्टमेंट या फ्रेंचायझींमध्ये कोण करणार? हाच सर्वात मोठा प्रश्न होता. मात्र, मोदींच्या या संकल्पनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यांना हवी तितकी गुंतवणूक करणारे अतिश्रीमंत लोक मिळाले. अंबानी-मल्ल्या या प्रथितयश बिझनेसमॅनपासून बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान-प्रीति झिंटा यांनी ही गुंतवणूक केली होती. आज १५ वर्षांनंतर अनेक संघांचे मालक बदललेत, संघ बदलले आहेत. त्याचबरोबर आयपीएल आणि टीम्सची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढलीये. अशात आधीच श्रीमंत असलेले हे संघमालक आणखी श्रीमंत झालेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, इतकी मोठी गुंतवणूक करणारे हे संघमालक किती श्रीमंत असतील? त्यांची एकूण संपत्ती किती असेल? याचा आढावा या लेखातून घेऊ…
मुंबई इंडियन्स
२००८ मध्ये आयपीएलची सुरूवात झाली, तेव्हा सर्वात महाग फ्रेंचायझी होती मुंबई. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्या फ्रेंचायझीचे मालक होते. पुढच्या काळात त्यांचा मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनला. सोबतच अंबानी यांनी जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्रांती करत आपल्या संपत्तीतही चांगलीच वाढ केली. आज विचार केल्यास अंबानी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. विविध बिझनेस आणि गुंतवणूक यांच्या माध्यमातून त्यांची संपत्ती २०२२ मध्ये १०३ बिलियन म्हणजेच ७.८ लाख करोड इतकी अवाढव्य झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
आयपीएलच्या पॉप्युलर फ्रेंचायझींपैकी एक असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्ताधर्ता, ब्रँड अँबेसिडर, मालक एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान. जगातील टॉप अभिनेत्यांपैकी एक असलेला शाहरुख पैसा आणि प्रसिद्धीच्या बाबतीत अजिबात मागे नाही. शाहरुखच्या एप्रिल २०२२ मधील एकूण संपत्तीचा विचार केला तर, तो आकडा ५२८० कोटी इतका मोठा होतो. याच संघाचे सहमालक असलेल्या जय मेहता यांची संपत्ती २७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थान रॉयल्स
आयपीएलच्या पहिल्याच हंगामामध्ये चॅम्पियन बनण्याची कामगिरी राजस्थान रॉयल्सने केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी सर्वात स्वस्तात विकली गेलेली ही फ्रॅंचाईजी होती. मात्र आज फ्रॅंचाईजीची ब्रँड व्हॅल्यू चांगलीच वाढली आहे. राजस्थान फ्रॅंचाईजीला विविध मालक आहेत. मात्र, त्यापैकी सर्वाधिक ६५% शेअर्स हे मनोज बदाले यांच्याकडे आहेत. मनोज बदाले हे इंग्लंडमध्ये एमर्जिंग मीडिया नावाची फर्म चालवतात. वेंचर कॅपिटलिस्ट असलेल्या बदाले यांची संपत्ती २०२२ च्या सुरुवातीला १६० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी सांगण्यात आलेली.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली डेअरडेव्हिल्स या नावाने आयपीएलमध्ये सुरुवात करणाऱ्या दिल्ली फ्रॅंचाईजीचे २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स असे नामकरण करण्यात आले. यामागील सर्वात मोठे कारण होते, दिल्ली फ्रेंचाइजीचे मूळ मालक असलेल्या जीएमआर ग्रुपने आपले ५०% शेअर्स जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सला विकल्याचे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सातत्याने यशस्वी होत आहे. मार्च २०२२ मधील उपलब्ध माहितीनुसार, जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे काम पाहणाऱ्या पार्थ जिंदाल यांची एकूण संपत्ती ७०६ कोटी इतकी आहे. दुसरीकडे जीएमआर ग्रुपची एकूण संपत्ती १३०० कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात येते.
पंजाब किंग्ज
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अपयशी फ्रॅंचाईजी म्हणून पंजाब किंग्सकडे पाहिले जाईल. ते फक्त एकदाच आयपीएल अंतिम सामन्यापर्यंत प्रवास करू शकलेत. अभिनेत्री प्रीती झिंटा, बिझनेस टायकून नेस वाडिया, करण पॉल व मोहित बर्मन हे त्यांचे संघमालक आहेत. एकट्या प्रीतीच्या संपत्तीचा विचार केला तर ती २५० कोटींच्या आसपास आहे. मात्र, वाडिया ग्रुपची जबाबदारी सांभाळत असलेल्या नेस वाडिया यांची एकूण संपत्ती तब्बल २६,०७४ इतकी आहे.
चेन्नई सुपर किंग्ज
मुंबई इंडियन्सपाठोपाठ आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. एमएस धोनीचा करिष्मा या फ्रॅंचाईजीसाठी फायदेशीर ठरला. आज सीएसके आयपीएलमधील दुसरी सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेली फ्रॅंचाईजी आहे. त्यांची मालकी पहिल्यापासून इंडिया सिमेंट यांच्याकडेच राहिलीये. एन श्रीनिवासन यांच्या मालकीच्या या इंडिया सिमेंटची मोठी उलाढाल असते. त्यांनी मार्च २०२२ मध्ये आपल्या वार्षिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, त्यांची सध्याची एकूण संपत्ती ५६०० कोटींची आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
पहिल्या आयपीएलवेळी दुसरी सर्वात महागडी फ्रॅंचाईजी ठरली होती बेंगलोर. लिकर किंग विजय मल्ल्या यांनी ही फ्रॅंचाईजी खरेदी केली होती. मात्र, २०१५ मध्ये ते दिवाळखोरीत आल्यानंतर त्यांनी ही फ्रॅंचाईजी युनायटेड स्पिरिट्सला विकली. बेवरेज क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या युनायटेड स्पिरिट्सने आपल्या वार्षिक अंदाजपत्रात आपली सध्याची एकूण संपत्ती ९१ बिलिन इंडियन रूपीज म्हणजेच ४१२६ इतकी असल्याच्या नमूद केले होते.
सनरायझर्स हैदराबाद
डेक्कन क्रॉनिकलने २०१३ मध्ये हैदराबाद फ्रॅंचाईजी सोडल्यानंतर, सन टीव्हीचे कलानिधी मारन त्या फ्रॅंचाईजीचे मालक बनले. राजकारण आणि बिझनेस या क्षेत्रांतील मातब्बर असलेल्या मारन यांनी फ्रॅंचाईजीचे सनराइजर्स हैदराबाद असे नामकरण केले. २०१६ मध्ये संघ आयपीएल विजेता देखील बनला. सन ग्रुपचे सर्वेसर्वा असलेल्या मारन यांची सध्याची संपत्ती मार्च २०२२ नुसार १८,५३४ इतकी भली मोठी आहे.
लखनऊ सुपरजायंट्स
आयपीएलमध्ये २०२२ सीझनपासून दोन नव्या फ्रॅंचाईजी सहभागी झाल्या. यातील लखनऊ फ्रॅंचाईजीसाठी प्रसिद्ध भारतीय बिझनेसमन संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने ७०९० कोटी रुपयांची बोली लावली. ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचाईजी आहे. मार्च २०२२ मधील अहवालानुसार एकट्या संजीव गोयंका यांची संपत्ती २० हजार कोटी रुपये असल्याची सांगण्यात आली.
गुजरात टायटन्स
लखनऊसोबत नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रॅंचाईजीचे मालक कोणी एक व्यक्ती नाही. सीवीसी कॅपिटल्स या ब्रिटनमधील कंपनीने ५,६२५ कोटी रुपयांना ही फ्रॅंचायजी आपल्या नावे केली. सध्या आयपीएलमधील दहाही संघ मालकांचा विचार केल्यास, सीबीसी कॅपिटल्स या सर्वांमध्ये श्रीमंत आहे. इन्वेस्टमेंट पार्टनर्सच्या मदतीने उभे राहिलेल्या या कंपनीची मागील वर्षाची उलाढाल तब्बल ९४ ट्रिलियन इतकी मोठी होती.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Final 2022 I गुजरातसाठी स्वप्नवत प्रवास, तर राजस्थानने अनेक संकटे पार करत गाठलीये फायनल
आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण