सध्या टोकियोमध्ये पॅरालिम्पिक सुरु आहे. यामध्ये भारतासाठी रविवारचा (२९ ऑगस्ट) दिवस खास ठरला. निषाद कुमारने भारताला दिवसातील दुसरे रौप्य पदक मिळवून दिले. तसेच पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने देखील भारतासाठी रौप्यपदक जिंकले आहे. हे यश मिळवल्यांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पदक विजेत्या खेळाडूंचे ट्विट करत कौतुक केले आहे.
निषाद कुमारला टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. तसेच वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी त्याला आपला एक हात गमवावा लागला होता. परंतु, त्याने धीर सोडला नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात केली. आता त्याने टोकियो पॅरालंपिक स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी टी -४७ स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. कुमारने २.०६ मीटर उडी मारत नवीन आशियाई विक्रम आपल्या नावावर केला.
निषाद कुमारसह अमेरिकेच्या डलास वाईजला देखील रौप्य पदक देण्यात आले. कारण दोघांनी २.०६ मीटर उंच उडी मारली होती. तर अमेरिकेच्या रोडरिक टाउनसेंडने २.१५ मीटर लांब उडी मारत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यासह सुवर्ण पदक देखील पटकावले. तसेच याच स्पर्धेत भारतीय खेळाडू राम पालने १.९४ मीटर उडी मारली. त्याने पाचवा क्रमांक पटकावला.
https://twitter.com/ParalympicIndia/status/1431964253515227140
हिमाचलमधल्या अम्ब शहरातून येणाऱ्या निषाद कुमारचे वडील हे शेतकरी आहेत. त्याचा डावा हात शेतातील गवत कापणाऱ्या यंत्रणेत गेला होता. ज्यामुळे त्याला आपला हात कायमचा गमवावा लागला होता. तसेच कुमारने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या फाजा विश्व पॅरा ॲथलेटिक्स ग्रां प्रीमध्ये पुरुषांच्या उंच उडी टी ४६/४७ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. हे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे दुसरे पदक आहे.(Who is Nishad kumar who won silver medal for India in Tokyo Paralympic, click here to know)
तसेच नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत निषाद कुमारचे कौतुक केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”टोकियो मधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मला खूप आनंद होत आहे की, निषाद कुमारने उंच उडी टी ४७ स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. तो उत्कृष्ट कौशल्य असलेला एक अद्भुत खेळाडू आहे. खूप अभिनंदन..”
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरालिम्पिकमध्ये भारताला दिवसातील तिसरे पदक, ४१ वर्षीय विनोद कुमारने जिंकले ‘कांस्य’
पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनची ‘रुपेरी’ कामगिरी, ‘या’ लोकांना केले पदक समर्पित






